Maharashtra Political News Updates, 24 February 2023: चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कसबा मतदारसंघात रोड शो केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, “काल त्यांनी प्रचाराचे भाषण देखील घरी बसून दिले, त्यांना माहीत होतं की इथे पराभव होणारच आहे. मग मतदारसंघात जाऊन ती काय फायदा? आधीही ते घरीच बसले होते, आताही घरूनच भाषण करत आहेत.”

राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या
bjp cautious in north central mumbai constituency searching for a good candidate
Lok Sabha Election 2024 : पराभवाच्या भीतीमुळे भाजपची उत्तर मध्य मुंबईत सावध भूमिका?
Live Updates
18:12 (IST) 24 Feb 2023
कसबा पोटनिवडणूकीत चर्चेत असलेल्या 'पुण्येश्वर मंदिर'चा नेमका इतिहास काय आहे?

पुणे हे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील मशीद हे सध्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. मात्र, उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश मिळालेला असतानाही वक्फ बोर्डाच्या माध्यमातून या जागेवर बहुमजली बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे.

सविस्तर वाचा

18:07 (IST) 24 Feb 2023
चंद्रपूर: वाघ जुमाणेना…. गुराखी ठार, गोठ्यात शिरून बैलाचाही घेतला घास!

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत कच्चेपार येथे गुरुवारी सायंकाळी पट्टेदार वाघाने बाबुराव लक्ष्मण देवतळे (५५) यांच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत देवतळे यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणण्यात येत असतांना प्रकृती अधिक गंभीर झाल्याने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे देवतळे यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 24 Feb 2023
नागपूर: मेट्रोची नवी योजना, शंभर रुपयात एक दिवस अमर्यादित प्रवास संधी

विद्यार्थ्यांना मेट्रोभाड्यामध्ये ३० टक्के सवलत दिल्यानंतर आता महामेट्रोने सर्वप्रवाशांसाठी आणखी एका योजना जाहीर केली आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारीपासून १०० रुपयात ‘डेली पास’ घेऊन एक दिवस मेट्रोच्या सर्व मार्गिकांवरून अमर्यादित प्रवास करता येणार आहे.

सविस्तर वाचा

17:27 (IST) 24 Feb 2023
पवई जेवीएलआर वर रस्ता खचला; वाहतूक विस्कळीत

मुंबईतील पवई जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर पवई सुवर्ण मंदिर जवळ अचानक रस्ता खचल्याने वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. यामुळे विक्रोळी वरुण अंधेरी कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी इथे पालिकेने काम केले होते. मात्र त्यावर निकृष्ट दर्जाच रस्ता बनवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

16:18 (IST) 24 Feb 2023
चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार नोंदणीकृत बेरोजगार; स्थानिक उद्योगात युवकांना रोजगार नाही

औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे. या जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३४५ नोंदणीकृत बेरोजगार आहेत. यामध्ये अभियंता, वकील, एमबीए, पदव्युत्तर, पदवी, आयटीआय, वैद्यकीय क्षेत्र, तांत्रिक तथा अन्य बेरोजगार युवकांना समावेश आहे.

सविस्तर वाचा

16:17 (IST) 24 Feb 2023
चंद्रपूर: टॅब वाटप, एकाच वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने गोंधळ

चंद्रपूर येथील समाज कल्याण विभाग कार्यालयात महाज्योती अंतर्गत ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप सुरू आहे. एक दिवस अगोदर ५०० पेक्षा अधिक विद्यार्थांना टॅब वाटपची माहिती देण्यात आली. त्यात कार्यालयात एकाच टेबल वरून वाटप सुरू असल्याने गोंधळ उडाला आहे.

सविस्तर वाचा

16:17 (IST) 24 Feb 2023
बुलढाणा: ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धिविनायक बोन्द्रे यांचे निधन; चिखलीतील 'अनुराधा परिवार'चे शिल्पकार

जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा चिखलीतील 'अनुराधा परिवार' शिल्पकार सिद्धिविनायक उपाख्य तात्यासाहेब बोन्द्रे यांचे आज निधन झाले. मागील काही काळापासून 'वानप्रस्थाश्रम' मध्ये राहणाऱ्या व आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्म मध्ये रमलेल्या या नेत्याने ८२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

सविस्तर वाचा

16:16 (IST) 24 Feb 2023
नागपूर: आमदाराचा कोप आणि….मेळघाट व्याघ्रप्रकल्पात पसरली होती भयाण शांतता

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने त्यांचा स्थापना दिवस मोठा धुमधडाक्यात साजरा केला. या स्थापना दिनाने कधी नव्हे ते विविध पक्षाच्या आमदारांचा एकत्र आणले. मात्र, त्याचवेळी मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना एका आमदाराने आंदोलनाची धमकी दिली

सविस्तर वाचा

16:16 (IST) 24 Feb 2023
नागपूर: शिंदे- फडणवीस सरकार जनतेच्या प्रश्नापासून लांबच.. सदाभाऊ खोत यांचा घरचा आहेर..

महाविकास आघाडी चे सरकार असतांना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाकडून सतत आवाज उचलले जात होते. परंतु आता एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांसह जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी करतसत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला.

सविस्तर वाचा

16:15 (IST) 24 Feb 2023
पुणे: कर्वे रस्त्यावर 'मोक्का' लावलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून

कर्वे रस्त्यावर सराईत गुन्हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गुन्हेगाराचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

16:15 (IST) 24 Feb 2023
डोंबिवलीतील डाॅक्टर आणि भागीदारांची चेन्नईच्या कंपन्यांकडून एक कोटीची फसवणूक

डोंबिवली येथील एमआयडीसीतील एम. डी. ठाकूर मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डाॅ. हर्षवर्धन दिलीप ठाकूर आणि त्यांच्या दोन भागीदार, सल्लागारांना कर्ज देण्याच्या बहाण्याने त्यांची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

सविस्तर वाचा

16:14 (IST) 24 Feb 2023
नागपूर: शेखावत यांच्या निधनावर नाना पटोले काय म्हणाले….

देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व जेष्ठ काँग्रेस नेते देवीसिंह शेखावत यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोक संवेदना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.

सविस्तर वाचा

16:14 (IST) 24 Feb 2023
जुनी पेन्शन, पदोन्नतीच्या मागणीसाठी’कॉस्ट्राईब’चे राज्यव्यापी आंदोलन; बुलढाण्यात निदर्शने

आपल्या विविध मागण्यांसाठी ‘कॉस्ट्राईब’ कर्मचारी महासंघाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. बुलढाण्यातही जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 24 Feb 2023
नंदुरबार: नर्मदा काठच्या गावांना लवकरच स्पीटबोटीव्दारे आरोग्य सुविधा - डाॅ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

नंदुरबार हा केंद्र सरकाराने आकांक्षित जिल्हा घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा देणारे डॉक्टर आणि आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:12 (IST) 24 Feb 2023
पुणे: महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार; युवतीला धमकावून एक लाख ३८ हजार उकळले

महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अल्पवयीन युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा

15:54 (IST) 24 Feb 2023
उल्हासनगरात ठाकरे गटाला गळती सुरूच, विद्यमान शहरप्रमुखाचा माजी नगरसेवकासह शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात लागलेली गळती थांबताना दिसत नाही. उल्हासनगर शहराचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

सविस्तर वाचा

15:38 (IST) 24 Feb 2023
डोंबिवली : बेकायदा चाळीमुळे बाह्यवळण रस्ता अडचणीत?, आयरे गाव हरितपट्टा बाह्यवळण मार्गातील एक किलोमीटर टप्प्यात बेकायदा चाळी

टिटवाळा येथून येणारा बाह्यवळण मार्ग डोंबिवलीतील आयरे भागातील हरितपट्टा परिसरातून जाणार असून हा एक किलो मीटर लांबीचा रस्ता पालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या रस्त्यावर बेकायदा चाळी, इमारती होत असून त्याकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

सविस्तर वाचा

14:35 (IST) 24 Feb 2023
पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुचाकी फेरी

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्व भागातील दुचाकी फेरीला समता भूमी येथून प्रारंभ झाला आहे. कसब्यातील लाल महाल येथे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची दुपारी समारोपाची सभा होणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:33 (IST) 24 Feb 2023
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली

जिल्ह्यात सर्वात कमी मतदारसंख्या असलेल्या कसबा मतदारसंघात सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कमी म्हणजेच ५१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.

सविस्तर वाचा

14:03 (IST) 24 Feb 2023
गोठे, तबेल्यांमधील मलमूत्राचा खत म्हणून उद्यानांसाठी वापर करावा, नदी प्रदुषण रोखण्यासाठी भाजपची मागणी

गोठे, तबेल्यांतील मलमूत्र थेट नद्यांमध्ये सोडण्यात येत असून त्यामुळे नद्या प्रदुषित होत आहेत. गोठे, तबेल्यांतील मलमूत्राचा वापर मुंबईतील उद्यानांमध्ये खत म्हणून केल्यास नद्यांमध्ये होणारे प्रदुषण रोखले जाईल, अशी सूचना भाजपने मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. 

सविस्तर वाचा

14:01 (IST) 24 Feb 2023
चीनचे असेही ‘पँगोलीन’ प्रेम; प्रेमासाठी वाट्टेल ते..

माणूस प्रेमात पडला की ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. मग ते प्रेम माणसाचे माणसासाठी असो, वा माणसाचे प्राण्यासाठी. चीन हे भारताचे शत्रुराष्ट्र, पण हेच राष्ट्र भारतीय ‘पँगोलीन’च्या प्रेमात पडले. त्याला मिळवण्यासाठी त्यांनी जीवंतच नाही तर शिकार करुन त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार वर्षात १२००हून अधिक ‘पँगोलीन’ त्यांनी या ना त्या पद्धतीने आपल्या ताब्यात घेतले.

सविस्तर बातमी

14:01 (IST) 24 Feb 2023
चिंचवडमध्ये १६८, कसब्यात ३८ सैनिक मतदार

लष्कर, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेवेतील जवानांबरोबरच प्रशिक्षण किंवा शासकीय सेवेनिमित्त परदेशात कार्यरत असलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कसबा, चिंचवड विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका दिल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:57 (IST) 24 Feb 2023
उमेदवारांचा प्रचार खर्च टाळण्यासाठी राजकीय पक्षांची क्लृप्ती, ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचा खर्च पक्षांच्या खाती

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, हा खर्च पक्षाच्या नावे लावण्यात आला असल्याने उमेदवारांचा प्रचार खर्च तुलनेने कमी दाखविण्याची क्लृप्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 24 Feb 2023
पुणे : नोकरीच्या आमिषाने संगणक अभियंत्याकडून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने एका संगणक अभियंत्याने आठ तरुणांची ११ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगणक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी संगणक अभियंत्याने आणखी काही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा

13:49 (IST) 24 Feb 2023
पुणे : एल निनोच्या परिणामांबाबत आताच निष्कर्ष काढणे अयोग्य, हवामान तज्ज्ञांचे मत

राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललेला असतानाच येणारा पावसाळा कसा असेल याची चिंता निर्माण करणाऱ्या एल निनोची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्च महिन्यातच एल निनोच्या प्रभावाचा अंदाज वर्तवणे हे फार लवकर असून या काळातील अंदाज सहसा चुकीचे ठरत आल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे.

सविस्तर वाचा

13:46 (IST) 24 Feb 2023
पित्याकडून अडीच वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे; पिता अटकेत

पित्याने अडीच वर्षाच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पित्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पत्नीने फिर्याद दिली आहे. आरोपी पिता शहरातील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे.

सविस्तर वाचा

13:45 (IST) 24 Feb 2023
“आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या…” नितेश राणेंनी अजित पवारांना लगावला टोला!

खासदार संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्वीट केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणेंवर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. तर, त्यांच्या टिप्पणीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:38 (IST) 24 Feb 2023
डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात रस्त्यावरील धुळीने नागरिक हैराण

डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली भागातील नांदिवली नाला, स्वामी समर्थ मठ ते नांदिवली तलाव रस्त्यावर संध्याकाळच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट उडत असून यामुळे या भागातील रहिवासी, पादचारी, व्यापारी धुळीच्या त्रासाने हैराण आहेत.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 24 Feb 2023
ठाण्यात उद्यापासून ‘पेट फेस्टिव्ह’, पाळीव प्राण्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीरासह श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा

ठाण्यातील ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्या माध्यमातून यंदाही ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांसाठी विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, फॅशन शो आणि ट्विन वाॅक असे आगळे-वेगळे कार्यक्रम याठिकाणी होणार आहेत.

सविस्तर वाचा

13:35 (IST) 24 Feb 2023
डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोहण्याचे धडे घेत असलेल्या डोंबिवलीतील आरव गोळे या १० वर्षाच्या विद्यार्थ्याने धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३९ किलोमीटर अंतर आठ तास ४० मिनिटात पोहून पार केले.

सविस्तर वाचा

13:33 (IST) 24 Feb 2023
नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पाची कागदपत्रे आता संकेतस्थळावर, नागरिकांची फसवणूक टाळणार

बनावट बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या आधारे गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी आता महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना त्यांची प्रमाणपत्रे त्यांच्यासह महारेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 24 Feb 2023
नागपूर : ३० ट्रकचा मालक, करोनात डबघाईस आला, नुकसान भरून काढण्यासाठी…

पंजाबमधील ३० ट्रकचा मालक असलेल्या वाहतूकदाराला करोनात खूप नुकसान झाले. त्यामुळे त्याला सर्व ट्रक विकावे लागले. करोनात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने काही साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून चोरीचे ट्रक विक्री करण्याची योजना आखली.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 24 Feb 2023
गडचिरोली : विदेशी पर्यटकांसाठी वाघाची शिकार आयोजित करणारे ‘पोर्ला इस्टेट’चे नवाब! वाचा सविस्तर…

देशात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर भारत सरकारने १९७२ मध्ये बंदी घातली. तेव्हापर्यंत देशात शिकार पर्यटन हा व्यवसाय अस्तित्वात होता. त्यात वाघाच्या शिकारीसाठी विदेशातून पर्यटक यायचे. मध्य भारतात असेच एक ठिकाण प्रसिद्ध होते ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ‘पोर्ला इस्टेट’.

सविस्तर वाचा

13:28 (IST) 24 Feb 2023
विद्युत जोडणी कापल्यामुळे धान उत्पादक संतप्त

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने विद्युत बिलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार पंपची जोडणी कापण्याचा सपाटा सुरू केला आहे. या विरोधात सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा प्रश्न आ. मनोहर चांद्रिकापुरे यांच्या समोर उपस्थित केला.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 24 Feb 2023
‘आपला दवाखान्यां’त १९ दिवसात एक लाख रुग्णांवर उपचार, ‘जी उत्तर’ विभागातील १७ दवाखान्यांत एक लाखांहून अधिक रुग्णांना सेवा

प्रभादेवी परिसरातील सेंच्युरी बाजार येथील म्हाडा वसाहतीमध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून २१ जणांची दोन कोटी ३० लाख  रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 24 Feb 2023
कोर्लई येथील १९ बंगले घोटाळा प्रकरण; ग्रामसेवकासह, सरपंच आणि सदस्यांवर गुन्हा दाखल

अलिबाग : कोर्लई येथील ठाकरे आणि वायकर कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहाजणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:04 (IST) 24 Feb 2023
नवी मुंबई पोलिसांचा दणका,करोडोंच्या गुटख्यासह चार आरोपी जेरबंद

नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकच्या तुर्भे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी एका संशयित टेम्पो मधून तब्बल १२ लाखांचा गुटखा जप्त केला होता,त्याच अनुषंगाने तपासात आणखी एका गुजरात मधून आलेल्या कंटेनरसह ताब्यात घेऊन तपासात कंटेनर मध्ये जवळपास 60 लाखांचा गुटखा असल्याचे दिसून आले, आतापर्यंत पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

12:03 (IST) 24 Feb 2023
लवकरच दिघा स्थानकाचे होणार उद्घाटन; ठाणे, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ठाणे - वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले असून, लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून ८० टक्के काम झाले आहे. दिघा रेल्वे स्थानक लोकल थांब्यासाठी सज्ज झाले असून चाकरमानी, प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

12:02 (IST) 24 Feb 2023
कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा घोटाळाप्रकरणी संजय भोसलेला अटक

महापालिकेच्या घरफाळा गैरव्यवहारातील मूळ फिर्यादी असलेला तत्कालीन करनिर्धारक संजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. १३ जून २०२० ला गैरव्यवहाराची फिर्याद संजय भोसले यांनी दिली होती. माजी नगरसेवक भोपाल शेटे यांनी घरफळा विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. ३ कोटी १४ लाख रुपयांचा हा गैरव्यवहार होता.

12:00 (IST) 24 Feb 2023
श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी...