Maharashtra News Updates Today : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार त्यांना मंत्रीपद मिळणार असा दावा करत आहे. दुसरीकडे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन करणार असल्याच्या मुद्द्यावरही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. १९ विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स…

maharashtra state electricity workers federation marathi news
‘वीज कर्मचाऱ्यांचे अत्यावश्यक सेवेच्या नावावर शोषण…’
Child care leave
“बालसंगोपन रजा नाकारणं म्हणजे घटनेचं उल्लंघन”, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणावरून फटकारले!
Supreme Court Asks If Voters Can Get VVPAT Slip
निवडणुकीचे पावित्र्य टिकावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव
bjp in loksabha election poll
Lok Sabha Elections 2024: मोदी सरकारसाठी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा किती परिणामकारक ठरेल? मतदारांच्या मनात काय?
Live Updates

Mumbai News Updates Today : राजकारणासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर...

22:04 (IST) 25 May 2023
"भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेतले आणि...", नाना पटोलेंचे गंभीर आरोप, म्हणाले...

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी.

- नाना पटोले (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)

21:02 (IST) 25 May 2023
"पप्पू फिर फेल हो गया", चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाल्या, "खरंच त्यांचा..."

https://twitter.com/ChitraKWagh/status/1661720693988548608

चित्रा वाघ म्हणाल्या, "'पप्पू फिर फेल हो गया'. राहुल गांधी पप्पू आहेत हे जगजाहीर आहे. तरी पण वारंवार पप्पू असल्याचं सिद्ध करण्याची हुक्की त्यांना का येते हे कळत नाही. खरंच त्यांचा अभ्यास कच्चा आहे."

"राहुल गांधींनी नवीन संसद भवन उद्घाटनावर बहिष्कार टाकून अपशकुन आणण्याचा प्रयत्न केला, पण असे कितीही मांजर-बोके आडवे गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास रथ रोखता येणार नाही," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

"संसदेसारख्या पवित्र मंदिरावर बहिष्कार टाकणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहावा. विरोध करणाऱ्यांचा बुरखा टराटरा फाटलाय," असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला.

यावेळी चित्रा वाघ यांनी विधान सभा भवन आणि संसदेच्या इमारतींचे उद्घाटन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच वाचून दाखवली. ती यादी खालीलप्रमाणे...

इंदिरा गांधी - संसदेच्या अॅनेक्स इमारतीचे उद्घाटन केले.

इंदिरा गांधी - महाराष्ट्राच्या विधान भवनाचे उद्घाटन इंदिरा गांधींच्या हस्ते झाले.

राजीव गांधी - संसदेच्या लायब्ररी इमारतीचे उद्घाटन केले.

मनमोहन सिंग - सोनिया गांधींनी मणिपूरच्या इंफाळ येथे विधान भवनाचे उद्घाटन केले.

नितीश कुमार - नितीश कुमारांच्या हस्ते बिहार विधान भवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन झाले.

तामिळनाडू विधानसभेच्या उद्घाटनाला सोनिया गांधी हजर होत्या. राज्यपालांना बोलावलं नाही.

तरुण गोगोई - आसाम विधानसभेचे उद्घाटन काँग्रेसचे नेते तरुण गोगोई यांच्या हस्ते झाले.

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी २०१८ मध्ये विधानभवनाचे उद्घाटन केले.

20:42 (IST) 25 May 2023
अरविंद केजरीवालांबरोबर काय चर्चा झाली? माहिती देत जयंत पाटील म्हणाले, "केंद्र सरकारने..."

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1661708191137427456

जयंत पाटील म्हणाले, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पंजाबचे मुखमंत्री भगवंत मान, आम आदमी पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते."

"राजधानी दिल्लीचे प्रशासकीय अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हातात दिले होते. केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला फाटा फोडला आहे. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत एकत्र येण्याच्या दृष्टीने आज चर्चा झाली," असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

20:06 (IST) 25 May 2023
पाडलेली मजार पन्हाळ्यात हिंदू मुस्लिमांनी पुन्हा उभारली

कोल्हापूर: ऐतिहासिक पन्हाळा गडावरील तानपीर बाबांचा दर्गा मजारीची मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून नासधूस केली होती. या घटनेनंतर तणावाचे वातावरण बनले. प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक हिंदू-मुस्लिमांनी एकजूट दाखवत मजारीची पूर्ववत उभारणी केली.

हेही वाचा...

19:40 (IST) 25 May 2023
माळमाथ्याचा हंडा मोर्चा – २६ गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या

नाशिक: मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील २६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मालेगाव येथील जुन्या बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

19:02 (IST) 25 May 2023
अधिसभेवरील संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्याशाखांच्या प्रतिनिधींची निवडणूक जून महिन्यात

मुंबई: मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आगामी अधिसभा निवडणुकीसाठी नुकतीच प्राचार्य, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विभागप्रमुख या मतदारसंघासाठीची अंतिम मतदारयादी जाहीर केली.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 25 May 2023
VIDEO: शेतीसाठीच्या वीज पुरवठ्यावर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, "आता..."

राज्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पाण्याविना पीकं जळल्याने अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच आता शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देऊ, असं जाहीर केलं. ते गुरुवारी (२५ मे) सोलापूरमध्ये भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात बोलत होते.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 25 May 2023
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपच्या नेत्यांनी गुरुवारी (२५ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यानंतर शरद पवारांनी या भेटीवर बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी भेटीचं कारण सांगतानाच दिल्ली सरकारच्या अधिकारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा केजरीवाल सरकारला पाठिंबा जाहीर केला. तसेच इतर राज्यातून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही नमूद केलं.

सविस्तर वाचा...

18:27 (IST) 25 May 2023
सशुल्क झोपडी अडीच लाखांत! शासन निर्णय जारी

मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सशुल्क घरासाठी झोपडीवासीयांना अडीच लाख रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय अखेर शिंदे-फडणवीस सरकारने जारी केला आहे.

सविस्तर वाचा..

18:07 (IST) 25 May 2023
हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही - देवेंद्र फडणवीस

हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही. यांनी २०१९ मध्येही हे करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्येही हे करून पाहिलं. मात्र, जनता मोदींच्या पाठिशी, भाजपाच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा असो भाजपालाच पाठिंबा मिळेल.

- देवेंद्र फडणवीस

18:05 (IST) 25 May 2023
मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढलं - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढण्याचं काम केलं. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची लढाई देशाचा पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवला जाऊ शकतो हे गेल्या ९ वर्षात मोदींनी दाखवून दिलं. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोदींवर टीका करत आहेत.

- देवेंद्र फडणवीस

18:03 (IST) 25 May 2023
...तर शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ - देवेंद्र फडणवीस

यातील दुसरं क्रांतीकारी पाऊल म्हणजे सोलर फीडर तयार करण्यासाठी सरकारी जमीन नसेल, तर आम्ही शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ.

- देवेंद्र फडणवीस

17:53 (IST) 25 May 2023
नाशिक: दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू

नाशिक: शहरात त्र्यंबक रस्त्यावरील धामणकर चौकात दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:35 (IST) 25 May 2023
शेतीसाठीच्या वीज पुरवठ्यावर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, "आता..."

आता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना आणली आहे. त्यात आपण कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास वीज देणार आहोत.

- देवेंद्र फडणवीस

17:24 (IST) 25 May 2023
मुंबईतील नालेसफाई पूर्ण; एक आठवडा आधीच नालेसफाई झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

मुंबई: मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून नाल्यांमधून १०० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. नाल्यांमधून ३१ मेपर्यंत गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 25 May 2023
डोंबिवली : बेकायदा इमारतीमधील सिमेंट, विटा मालवाहू उद्वाहनाचा परिसराला धोका

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील एका बेकायदा इमारतीच्या मजल्यांवर सिमेंट, विटा, सिमेंट गिलावा वाहून नेण्यासाठी एक उद्वाहन रस्त्याच्या बाजुला आणि इमारती लगत उभी करण्यात आले आहे. अतिशय धोकादायक स्थितीत हे उद्वाहन उभे असल्याने वादळी वारा आला तर कोसळण्याची भीती पादचारी, वाहन चालक, परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाचा सविस्तर...

17:11 (IST) 25 May 2023
बारावीच्या निकालात कॉपीबहाद्दर गोंदिया जिल्हा नागपूर विभागात अव्वल

नागपूर: नागपूर विभागाने यंदा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गतही भरारी पथके नेमण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 25 May 2023
बारावीच्या निकालात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा दुसऱ्यास्थानी; यंदाही मुलींचाच डंका

बुलढाणा: आज जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्याने बाजी मारली असून अमरावती विभागात बुलढाणा द्वितीय ठरला आहे. नेहमीच्या अलिखित नियमाप्रमाणे निकालात मुलींचा डंका वाजला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३३ हजार ५९ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. सविस्तर वाचा…

17:09 (IST) 25 May 2023
नागपूरमध्ये मेट्रो स्थानकावर लवकरच ओपन एअर रेस्टॉरंट, कॅफे

नागपूर : महा मेट्रो नागपूर अंतर्गत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सर्वत्र मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहे. यामध्ये आणखी भर घालत नागपूर  मेट्रो स्टेशनच्या छतावर उपलब्ध  जागेवर ओपन एअर रेस्टॉरंट, सुरू करण्याचा प्रस्ताव आहे यासाठी  निविदा काढण्यात आल्या आहे.   सविस्तर वाचा…

17:08 (IST) 25 May 2023
‘मंदिर,मशीद,चर्च’च्या वीज दराबाबत व्हायरल पोस्ट खरी की खोटी?; महावितरणचा दावा काय?,जाणून घ्या सत्य…

व्हॉट्सॲप, फेसबुकसह विविध समाज माध्यमांवर मंदिर, मशीद, चर्चबाबत प्रतियुनिट विविध वीज दराचा दावा करत मंदिरसाठी सर्वाधिक दर असल्याचे संदेश फिरत आहे. हा संदेश नागरिकांची दिशाभूल करण्यासोबत सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करण्याचा प्रकार असल्याचा महावितरणचा दावा आहे. सविस्तर वाचा…

17:07 (IST) 25 May 2023
रानडुकराची शिकार करताना वाघीण जखमी; टीपेश्वर अभयारण्यातील घटना

रखरखत्या उन्हामुळे टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा जीवही कासावीस झाला आहे. तहान भागविण्यासाठी वाघ पाणवठ्यावर येत असल्यामुळे पर्यटकांचीही या ठिकाणी गर्दी वाढली आहे. दरम्यान, पाणवठ्यावर आलेली एक वाघीण जखमी असल्याचे पर्यटकांनी टिपलेल्या छायाचित्रात दिसून आले. सविस्तर वाचा…

17:06 (IST) 25 May 2023
नाशिक : जळगावची आघाडी, नाशिक तळाला ; विभागाचा १२ वी निकाल ९१.६६ टक्के, गत वर्षीच्या तुलनेत २.६९ टक्के घट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल गुरूवारी आभासी प्रणालीन्वये जाहीर झाला. नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. सविस्तर वाचा…

16:47 (IST) 25 May 2023
मुंबईः हिऱ्यांची बेकायदेशीर आयात केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाला अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई

मुंबईः चढ्या भावाने हिऱ्यांची आयात करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला नुकतीच सीमाशुल्क विभागाने अटक केली. आरोपी संचालकाला यापूर्वी गुजरातमधील महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक केली होती.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 25 May 2023
नवीन पनवेलमध्ये सापडला बेवारस मृतदेह

पनवेल : नवीन पनवेलकडून पनवेल शहराकडे जाणा-या रेल्वे रुळाजवळील नाल्यामध्ये ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाचा बेवारस नग्नावस्थेतील मृतदेह पोलीसांना सापडला आहे. तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीसांनी मृतदेहाजवळ सापडलेले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. रेल्वे रुळालगतच्या नाल्यात हा मृतदेह कसा आला या शोधात पोलीस आहेत. या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरांच्या मार्फत पोलीस शोध घेत आहेत. संबंधित मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील यांनी दिली. तसेच मृतदेहाजवळ सापडलेले छायाचित्र आणि मृतदेहातील व्यक्ती यामध्ये साम्य असून या छायाचित्रास ओळखणा-यांनी खांदेश्वर पोलीसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

16:28 (IST) 25 May 2023
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

https://twitter.com/AamAadmiParty/status/1661683690584559617

आजची पत्रकार परिषद महत्त्वाची आहे. देशासमोर एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ दिल्लीचा नाही, तर संसदीय लोकशाहीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा आहे.

- शरद पवार

16:07 (IST) 25 May 2023
नाशिक: शिवशाही चालकाची बसमध्येच आत्महत्या

नाशिक: सिन्नर ते शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

सविस्तर वाचा...

15:25 (IST) 25 May 2023
१२ वी परीक्षेतील ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर, औरंगाबादमधील 'त्या' विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय झालं? वाचा...

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 25 May 2023
जळगाव: चोपड्यात बनावट कपाशी बियाणे, तर धऱणगावात रासायनिक खतांचा साठा जप्त

जळगाव - जिल्ह्यातील चोपडा येथे बनावट कापूस बियाणे, तर धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बनावट खतांचा साठा मिळून आला. चोपड्यात स्वदेशी-५ या बनावट कापूस बियाणांच्या विक्री प्रकरणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:36 (IST) 25 May 2023
डोंबिवलीत श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीकडून ग्राहकांची १७ लाखांची फसवणूक

डोंबिवली: येथील पूर्व भागातील चार रस्त्यावरील रघुवीरनगर मधील श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीने ४७ ग्राहकांची गेल्या वर्षभराच्या कालावधीत १७ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा...

14:24 (IST) 25 May 2023
पुणे: निकाल पाहण्यास अडचणी आल्यास थेट फोन करा..

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहण्यास अडचणी आल्यास मदतीसाठी राज्य मंडळाने सहा फोन नंबर जाहीर केले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

सविस्तर वाचा

14:00 (IST) 25 May 2023
नागपूर: सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निष्कासित माजी आमदार आशिष देशमुख म्हणतात, की मला पक्षातून काढण्याचे आधीच…

राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज दुखावला गेला असेल तर कॉंग्रेसच्या हितासाठी राहुल गांधी यांना भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागून हा विषय इथेच संपवायला पाहिजे. सविस्तर वाचा

13:59 (IST) 25 May 2023
Video : नागझिऱ्यातील ‘ती’ वाघीण पर्यटकांसमोर आली अन्…; स्थलांतरित वाघिणी स्थिरावत असल्याची नांदी

‘त्या’ दोघींना जंगलात सोडले तेव्हा ‘त्या’ हा नवा अधिवास स्वीकारतील की नाही, अशीच शंका होती, पण आठवडाभरातच त्यांनी हा अधिवास स्वीकारला आणि आता अगदी सहजपणे ‘त्या’ पर्यटकांसमोर येत आहेत. सविस्तर वाचा

13:35 (IST) 25 May 2023
मानखुर्द, गोवंडीमधील डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा; सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

मुंबई: मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्याच्या तोंडावर डोंगरावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा...

13:24 (IST) 25 May 2023
Maharashtra HSC Result 2023 पुणे: निकाल घटला, गुणवंतही घटले

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

सविस्तर वाचा

13:23 (IST) 25 May 2023
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलांची शहाड रेल्वे स्थानकात लोकलमध्ये स्टंटबाजी

कल्याण- शाळांना सुट्टी असल्याने डोंबिवलीतील दोन अल्पवयीन मुले पालकांची नजर चुकवून लोकलने शहाड रेल्वे स्थानकात लोकलने पोहचली. स्थानकात लोकल येत असतानाच ही मुले धावती लोकल पकडून थांबण्यापूर्वीच फलाटावर उड्या मारून थरारक जीवघेणी कृती करत होती.

सविस्तर वाचा

13:01 (IST) 25 May 2023
पुणे : लाकडाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत संसार उद्ध्वस्त; आता फक्त उरल्या घराच्या भिंती

पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमधील लाकूड साहित्याच्या सात-आठ गोडाऊनला पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली होती. कुरिअर ऑफिसमध्ये काम करणार्‍या संतोष रामचंद्र गायकवाड यांचं घर आगीच्या घटनेत पूर्णपणे जळून खाक झाले असून त्यांच्या घराच्या केवळ भिंतीच उरल्या आहेत.

वाचा सविस्तर...

12:53 (IST) 25 May 2023
तुमच्या मदतीची गरज आहे…’ असे का म्हणाले वसंत मोरे?

पुणे: महापालिका निवडणूक वर्षभरापासून रखडल्या असताना मनसे नेते वसंत मोरे यांनी स्व:खर्चातून केलेल्या विकासकामांचा मोडतोड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 25 May 2023
बेपत्ता मुली शोधण्यात नागपूर पोलीस अव्वल; पाच वर्षांत ८८८२ बेपत्ता; ८५०१ मुलींचा शोध

मागील पाच वर्षांत उपराजधानीतून ८ हजार ८८२ मुली-महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी नागपूर पोलिसांनी ८ हजार ५०१ मुलींची शोध घेतला आहे. मागील पाच वर्षांत केवळ ३८१ मुली-महिलांचा शोध लागला नाही. बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यातही नागपूर पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सविस्तर वाचा

12:47 (IST) 25 May 2023
अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९२.७५ टक्के; उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात चौथे स्थान

Maharashtra Board 12th Result Live Updates उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्‍हणजेच इयत्‍ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग चौथ्‍या स्थानी आहे.

सविस्तर वाचा

12:36 (IST) 25 May 2023
मुंबईवर पाणीकपातीचे ढग; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सरासरी १५.५७ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे १५.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढू लागली आहे.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 25 May 2023
डोंबिवलीतील फलकांवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख, छबीतून बाळासाहेब थोरात गायब

डोंबिवली: कर्नाटक विधानसभेच्या विजयानंतर उत्साह संचारलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत गुरुवारी संध्याकाळी हाथ से हाथ जोडो अभियानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सविस्तर वाचा...

12:13 (IST) 25 May 2023
नागपूर: शिवरायांचा मावळा अवघा पाच वर्षांचा; सर केले सहा हजार फुट उंचीचे जॉर्ज एव्हरेस्ट शिखर

नागपूर : वय वर्षे अवघे पाच… ध्येय मात्र एव्हरेस्ट सर करायचे… एवढ्या कमी वयात तर ते शक्य नाही, मग काय आईवडिलांना त्याचा हट्ट मोडवेना. मग काय.. तर उत्तराखंडमधील मसुरतील सर्वात उंच जॉर्ज एव्हरेस्ट शिखरची चढाई करायचे ठरले. सविस्तर वाचा

12:10 (IST) 25 May 2023
चंद्रपूर: नागपूर-हैदराबाद 'वंदे भारत एक्स्प्रेस' होणार सुरू

चंद्रपूर : नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर- हैद्राबाद रेल्वे सुरु करण्याबाबत २० डिसेंबर २०२२ ला पत्र लिहले होते ,या पत्राची दखल घेत नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच सुरू होणार आहे .

सविस्तर वाचा

12:09 (IST) 25 May 2023
पुण्यातील मुख्य १० चौकांतील कोंडी सुटणार! असा आहे महापालिकेचा 'प्लॅन'

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुख्य चौकांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानंतर शहरातील मुख्य दहा ठिकाणची कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने आता पावले उचलली आहेत. यामुळे लवकरच या कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 25 May 2023
पुण्यातील टिंबर मार्केटमधील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग, सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.तर या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम सुरू आहे.

सविस्तर वाचा

12:08 (IST) 25 May 2023
चंद्रपूर: आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर

चंद्रपूर : 'समस्या तुमच्या पुढाकार आमचा' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी २४ मे ला कन्नमवार सभागृहात आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

सविस्तर वाचा

12:08 (IST) 25 May 2023
नागपूर: मोबाईल हरवला? काळजी नको, इथे द्या तक्रार

नागपूर : गर्दीच्या ठिकाणी, बाजारात किंवा बस-रेल्वेत अनेकांच्या मोबाईलवर हात साफ केल्या जातो. हरविलेला मोबाईल मिळणारच नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, आता जर मोबाईल चोरी गेला किंवा हरवलाय तर नक्कीच पोलीस तक्रार करा.

सविस्तर वाचा

12:07 (IST) 25 May 2023
वर्धा : भीषण तापमानात 'जग्गू'साठी कुलर ठरलाय थंडा थंडा कुल कुल…

वर्धा : अवघा पाच दिवसाचा असताना आई सोडून गेली.कारण जन्मतः त्याचे डोळे आत वळले होते. दिसेनासे होत असल्याने ती चाचपडत जंगलात भटकत असताना वन अधिकाऱ्यांची त्याच्यावर दृष्टी पडली. देव तारी त्यास कोण मारी असे त्यास लागू पडावे.

सविस्तर वाचा

12:07 (IST) 25 May 2023
पुणे : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एकाचा खून

पुणे : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय -३८, रा. -राजीव गांधी नगर , बिबबेवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पारेकर व त्याचे दोन साथीदार (राहणार -बिबबेवाडी ,पुणे) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

12:06 (IST) 25 May 2023
नाशिकमध्ये आजपासून रोजगार मेळावा

नाशिक - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नाशिक जिल्हा वाहतूक संघटना यांच्या वतीने २५ ते २८ मे या कालावधीत सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत सिटी सेंटर मॉलजवळ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

Maharashtra Live Blog

महाराष्ट् न्यूज लाइव्ह