अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून ख्याती असलेल्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ३० वर्षांनंतर या गावात यंदा ग्रामपंचायत निवडणूक झाली. गावाला घडवणाऱ्या पोपटराव पवारांवरच ग्रामस्थांनी विश्वास दाखवला.
हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आदर्श ग्राम विकास पॅनलने किशोर साबले यांच्या परिवरत्न ग्रामविकास पॅनलचा धूळ चारली. आदर्श पॅनलचे विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, सुरेखा पादीर, मीना गुंजाळ, रंजना पवार, रोहिदास पादिर आणि पोपटराव पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.
पोपटराव पवारांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांपूर्वी हिवरे बाजार गावाची वाटचाल आदर्श गावाकडे सुरु झाली. निवडणुकांमुळे गावात कुरघोड्यांचे राजकारण चालते त्यामुळे या निवडणुका टाळून त्या बिनविरोध करण्याचा कार्यक्रम त्यावेळी हाती घेण्यात आला होता. मात्र, यंदा गावात एकाधिकारीशाही सुरु असल्याचा आरोप करत काहींनी बंडाचे निशाण फडकावले आणि ३० वर्षांनंतर हिवरे बाजारमध्ये निवडणूक पार पडली.
आणखी वाचा- Gram Panchayat Results : राणेंना शिवसेनेचे दे धक्का; तीन पैकी दोन जागी भगवा
विरोधकांनी कितीही एकाधिकारशाहीचे आरोप केले तरी हिवरे ग्रामस्थांनी मतदानातून आपला अजूनही पोपटराव पवारांवरच विश्वास असल्याचे दाखवून दिले.