Maharashtra Vidhan Sabha Election 2019  अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु झालं असून मतमोजणी अद्यापही सुरू आहे. मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघांमध्ये लक्षवेधी लढती होत असून त्या लढती अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. या लढतींबाबत प्रचंड उत्सुकता असून सर्वांचं लक्ष येथील निकालांकडे लागलं आहे. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष लागलं असताना साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही सुरु आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्याने साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

महाराष्ट्रातील या बिग फाइट्समध्ये मराठवाड्यात परळी मतदारसंघात भाजपाच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, कर्जत जामखेडमध्ये भाजपाचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे रोहित पवार, पुण्यातील कोथरुडमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे, दक्षिण कराड मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपाचे अतुल भोसले, काँग्रेसचे बंडखोर उदयसिंह पाटील उंडाळकर अशी तिहेरी लढत, कणकवलीतून भाजपाचे निलेश राणे व शिवसेनेचे सतिश सावंत यांच्यातील लढत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Petrol Diesel Price Today 15 April 2024
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात बदलले इंधनाचे दर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये
Petrol Diesel Price Today 14 April 2024
Petrol Diesel Price Today: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Price Today 11 April 2024
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर, मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?
Petrol Diesel Price Today 2 April 2024
Petrol Diesel Price Today: सकाळ होताच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा महाराष्ट्रातील आजचे नवे दर

हाती आलेल्या शेवटच्या कलांनुसार कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर – 

-सातारा लोकसभा पोटनिवडणूक: राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याकडून भाजपाच्या उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का.

-परळी : भाजपाच्या पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडून पराभवाचा धक्का, बहिण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे विजयी

-पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे याचा पराभव केला.

-कणकवली – नितेश राणे विजयी , शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव

-कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार विजयी, भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव

-वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा  70 हजार 191 मतांनी विजय

-बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधातील गोपीचंद पडळकर यांच्यासह सगळ्या उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त

-शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे- पाटील यांचा विजय तर पुण्यात मुक्ता टिळक विजयी

-सोलापूर शहर मध्य मतदारसंघ :  काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचा विजय, शिवसेनेचे दिलीप माने, अपक्ष महेश कोठे, MIM कडून फारुक शाब्दी आणि प्रणिती शिंदे या चारही उमेदवारांमध्ये झाली चुरशीची लढत.

-सावंतवाडी : सावंतवाडीतून शिवसेनेचे दिपक केसरकर विजयी, राष्ट्रवादीचे बबन साळगावकर व भाजपाचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांचा पराभव

-गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकतर्फी विजयी आघाडी घेतली आहे. मंत्री महाजन यांनी 11 हजार मतांनी आघाडी घेतली असून संजय गरूड हे पिछाडीवर आहेत.