West Bengal Election result 2021 : ममता बँनर्जी तर झाशीची राणी – छगन भुजबळ

संपूर्ण शक्ती लावूनही आसाम वगळता भाजपाला कुठेच साथ मिळाली नाही, असं देखील म्हणाले आहेत.

संग्रहीत छायाचित्र

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडव आव्हान देत, तुफान प्रचार करणाऱ्या भाजपाच्या वाट्याला मोठी निराशा आली आहे. या पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशभरातील राजकीय नेते मंडळींकडून त्यांचे कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पीडीपी अध्यक्ष महबुबा मुफ्ती, शिवसेना नेते संजय राऊत आदींसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छनग भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”ममता बॅनर्जी तर झाशीची राणी..” असं भुजबळ म्हणाले आहेत.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, ”बंगालची ममता दीदी एकटी आणि हे सगळे(भाजपा) अशी ही सगळी लढाई सुरू होती. पण ज्या प्रकारे झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी.. असं म्हटलं होतं, त्याच प्रकारे ममता बॅनर्जी देखील मेरा बंगाल नही दुंगी..असं म्हणत लढल्या आणि आज प्रचंड बहुमताने त्यांचा विजय होताना आपल्याला दिसतो आहे.”

Assembly Election Results 2021: भाजपा विरोधकांचा ममता दीदींवर कौतुकाचा वर्षाव

तसेच, ”संपूर्ण शक्ती लावूनही आसाम वगळता भाजपाला कुठेच साथ मिळाली नाही. बंगालमध्ये तर पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या, ८ ते १० मंत्री ठाण मांडून बसले होते.. पण उपयोग झाला नाही. भाजपा विरोधात प्रचंड लाट देशात तयार झालेली आहे. आता जर देशात निवडणूक झाली तर भाजपा कुठेही दिसणार नाही.” अशी टीका देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Assembly Election Results : शरद पवारांनी केलं ममतांचं अभिनंदन, म्हणाले…

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. “जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि करोना महामारीविरुद्ध लढा देण्याचं काम एकजुटीने करू,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mamata banerjee is queen of jhansi chhagan bhujbal msr

ताज्या बातम्या