केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांना खऱ्या मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही दिला होता. राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. जरांगे पाटील म्हणाले, “मी राणेंच्या वयाचा आदर करतो. मी त्यांना आजवर कधी काही बोललो नाही. परंतु, ते जर असं काही बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही.” तसेच त्यांनी नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांना विनंती केली आहे की, “त्यांनी त्यांच्या वडिलांना समजावून सांगावं. अन्यथा मी त्यांचा आदर करणार नाही.” जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथील त्यांच्या उपोषण स्थळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी पाटील यांना नारायण राणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावी!

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार

राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले, मी नारायण राणे यांना शेवटचं माफ करतो आणि सुट्टी देतो. परंतु, माझं निलेश राणे यांना सांगणं आहे की तुम्ही नारायण राणेंना थांबवा. कारण मलासुद्धा काही मर्यादा आहेत. अन्यथा मी इथून पुढे धुवून काढेन, कोणालाही सोडणार नाही. मी माझ्या मर्यादा सांभाळतोय. मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. माझ्या तोंडून नारायण राणेंबद्दल एकही शब्द निघालेला नाही. मी त्यांच्याबद्दल ब्र शब्द उच्चारलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. मग आम्हाला मराठा असल्याचा अभिमान का असू नये.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझा नारायण राणे यांना प्रश्न आहे की, तुम्ही तर पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता. मग आता तुम्हाला काय झालंय. मी मराठ्यांसाठी बोलतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजून बोलायला हवं होतं. तसेच मी तुम्हाला कधी काही बोललो नाही, तुमच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मग तुम्ही कोणाची री ओढताय? मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. तसाच मला मराठ्यांचा अभिमान आहे. उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तीनसिंगराव लागून गेलात का?

“…अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन”

मनोज जरांगे नारायण राणे यांना उद्देशून म्हणाले, मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. मी माझ्या मर्यादा पळतोय. मी तुम्हाला आजवर मानत होतो, आताही मानतो, म्हणूनच मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. तसेच माझी निलेश राणे यांना विनंती आहे की, नारायण राणे यांना समजावा. कारण पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. माझ्यापुढे कोण आहे हे मी बघणारच नाही. कोण आहे, काय आहे, किती मोठा माणूस आहे असलं काही मी बघणार नाही. मी नारायण राणेंचा, त्यांच्या वयाचा आदर करतो. ते मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन.

हे ही वाचा >> सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण चालू ठेवणार; मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका

मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले, मी नारायण राणे यांना आतापर्यंत पाच वेळा इशारा दिला आहे. परंतु, ते काही ऐकत नाही. आता मी त्यांना शेवटची संधी देतोय. तसेच मी मुद्दाम निलेश राणे यांना सांगतोय का तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा, उद्या ते काही बोलले तर मी त्यांना सोडणार नाही. आत्ता एका तासाने बोलले तरी मी त्यांना सोडणार. त्यांना खेटायचंच असेल तर माझीही तयारी आहे.