लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठींब्याची गरज आहे. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे जिजामाता समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

Kolhapur, Bidri Sugar Factory, Bidri Sugar Factory s president, k p patil , Court Ordered, Audit, Kolhapur news, marathi news
के. पी. पाटील यांनी आव्हान स्वीकारले; बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षण आदेशाचे स्वागतच
dalit youth commits suicide after after stripping and beating in kopardi
कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या; विवस्त्र करून मारहाणीनंतर टोकाचे पाऊल
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा

मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे पाटील आज किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन घेणार आहेत. यानंतर महाड येथे त्यांची छोटेखानी सभाही होणार आहे. यासाठी कालरात्री ते पोलादपूर मार्गे पाचाड येथे दाखल झाले. सकाळी जीजामाता समाधीचे दर्शन घेऊन किल्ले रायगडच्या दिशेने रवाना झाले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे ते मिळत नाही तोवर संघर्ष सूरूच ठेवणार आहे. या लढ्याला सर्वपक्षीय पाठींब्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा-रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले

कोकणातील राजकीय नेत्यांनी यापूर्वी जरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला असला तरी आता ते करणार नाहीत. त्यावेळी कोणाच्या तरी दबावामुळे कोकणातील नेत्यांनी तसा विरोध केला असेल, तरी आता ते विरोध करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला छत्रपतींचे आशिर्वाद मराठा समाजावरील अन्याया विरोधात सरू केलेल्या लढ्याला पन्हा जोमाने सुरू करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.