सांगली : अंथरुणावर खिळलेल्या आणि आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असणार्‍या वृद्धांना आपल्या आई-वडिलांसमान मानून त्यांची आस्थेनं सेवा शुश्रुषा करणार्‍या संवेदना वृद्धसेवा केंद्रातील परिचारकांच्या सेवेचे मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विक्रम सिंह कदम यांनी काढले.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवेदनामध्ये आयोजित केलेल्या परिचारिकांच्या सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, दरवर्षी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपण जाणतो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमिअन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करत हिंडणारी आद्य परिचारिका यांचा हा जन्मदिवस. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी नर्सिंगच्या आधुनिक पद्धतींचा पाया रचला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. ’आमच्या नर्सेस… आमचे भविष्य.. काळजी घेणारी आर्थिक शक्ती’ अशी यावर्षीच्या जागतिक परिचारिका दिनाची थीम ठरवण्यात आली आहे. त्यामुळे परिचारिकांच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठीही समाज म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

debt recovery marathi news
कर्जवसुली न्याय प्राधिकरण
Elon Musk China Visit
‘स्पेसएक्स’च्या महिला कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध, मुलं जन्माला घालण्यास दबाव; एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप
Kangana Ranuat
“माझ्या बहिणीला कोणताही पश्चाताप नाही”, कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
A record of winning more than 400 seats in the Lok Sabha In the name of Rajiv Gandhi himself
‘४०० पार’नंतरची कारकीर्द…
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
Kisan Kathore, Bhiwandi,
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक
nashik, Dr Vijay Bhatkar, Dr Vijay Bhatkar in nashik, mahiravani village, Sant Shree Dnyaneshwar Mauli Child Sanskar Camp,
परम संगणक निर्मितीला किती खर्च आला ? विद्यार्थ्यांची जिज्ञासा अन् डॉ. विजय भटकर यांचे हितगूज

हेही वाचा…जेजुरीत पॅरामोटर घरावर कोसळले, अपघातात एक महिला जखमी

यावेळी सुरुवातीला फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संवेदनातील सर्व परिचारिका व आया मावश्या यांचा डॉ. कदम यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अरविंद कुलकर्णी, डॉ अजित भरमगुडे, डॉ देवपाल बरगाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. काजल पवार, माधुरी कुमरे, श्रुती पाटील, आदित्य आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ दिलीप शिंदे यांनी स्वागत केले. डॉ नीलम शिंदे यांनी आभार मानले.