माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळ
नुकत्याच झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आर. सी. एफ. शाळा , कुरूळ येथील केंद्रात सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाची प्रश्नपत्रिका मराठीतून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.
मागणी करूनही विद्यार्थ्यांना इंग्रजीतून प्रश्नपत्रिका देण्यात आली नाही. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. मराठीमधून मिळालेली प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका सोडविण्यास मिळालेला कमी वेळ यामुळे विद्यार्थ्यांना गुण कमी मिळून विद्यार्थी शिष्यवृत्तीस मुकण्याची शक्याता आहे. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे (डीकेईटी) अध्यक्ष अमर वार्डे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
विद्यार्थ्यांना गणित विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजी ऐवजी मराठीतून देण्यात आली. त्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली. परंतु तुम्हाला काही अडले तर आम्हाला विचारा असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांनी मराठी शब्दाला इंग्रजी पार्यायी शब्द विचारला असता त्यांना उद्धट उत्तरे देण्यात आली. पालकांनी याबाबत केंद्रसंचालक कांबळे यांना भेटून चार्चा केली व याची माहिती दिली. त्यांनी पालकांनादेखील समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. विज्ञानाचा पेपर दहा मिनिटे उशिरा सुरू झाला. ही दाहा मिनिटे वाढवून देतो, असे पालकांना सांगण्यात आले. तीदेखील वाढवून देण्यात आली नाहीत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.