संगमनेर: पालक लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत एका नातेवाईकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक येथे उघडकीस आली आहे. संबंधित मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तात्काळ यातील मुख्य आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकारातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे अधिक तपास करत आहेत. घटनेतील पीडित मुलीवर जवळच्या नातेवाईकाने आई-वडील घरी नसल्याचे गैरफायदा घेत बलात्कार केला होता. त्यातून पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली. बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीसह चौघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीसांनी पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ‘पोस्को’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश असून या तिन्ही आरोपींनी फिर्यादीला सोन्याची चैन देतो, पैसे देतो, असे म्हणून आपण हे प्रकरण मिटवून घेऊ असे सांगितले. बाहेर वाच्यता केली तर तुला जिवंत सोडणार नाही, तुझ्या आई-वडिलांना मारून टाकू अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.