राज्यात गाजलेल्या येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार संशयित संजय बोरसे उर्फ थरथऱ्या (५०,रा. मोहाडी) याने बुधवारी गुजरातमधील दिंढोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कगुवा येथे गळफास घेतला. बोरसेची माहिती सांगणाऱ्यास पोलिसांनी पाच हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते.नगावबारी परिसरात बेबीबाई चौधरी ही कुंटणखाना चालविते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी चौधरीसह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रारंभी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात बोरसेचाही समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यापासून बोरसे फरार होता. सुरतजवळील दिंढोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कगुवा येथे नातेवाईकांकडे त्याने आश्रय घेतला होता. त्याचे नातेवाईक परशुराम पाटील हे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच इमारतीच्या लिफ्टच्या खोलीत बोरसेने गळफास घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
धुळेअत्याचार प्रकरणातील संशयिताची आत्महत्या
राज्यात गाजलेल्या येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार संशयित संजय बोरसे उर्फ थरथऱ्या (५०,रा. मोहाडी) याने बुधवारी गुजरातमधील दिंढोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कगुवा येथे गळफास घेतला. बोरसेची माहिती सांगणाऱ्यास पोलिसांनी पाच हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते.

First published on: 05-04-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molested suspected girl of dhule commit suicide