सोनईनजीक दलित समाजातील तिघा तरुणांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. शौचालय साफ करण्याच्या बहाण्याने या तरुणांना विठ्ठलवाडी शिवारात एका बागायतदाराने बोलावून घेऊन त्यांचा काटा काढला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
संदीप राजू थनवार (वय २४, रा. किन्ही, ता भुसावळ), सचिन सोनलाल घारू (२६, रा. खंडवा, मध्यप्रदेश), राहुल कंदारे (२६, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. खुनाचे कारण समजू शकले नसले तरी अनैतिक संबंधातून खून झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. खूनप्रकरणी पोलिसांनी प्रताप विश्वनाथ दरंदले व रमेश विश्वनाथ दरंदले (रा. विठ्ठलवाडी, ता. नेवासा) यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून, शौचालयाचा मालक पोपट दरंदले याचीही चौकशी सुरू आहे.
नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये तिघे शौचालय सफाईचे काम करतात. तिघांना पोपट दरंदले याने शौचालय साफ करण्यासाठी बोलावून घेतले होते. तिघे एमएच १७ ए ओ ८३६९ या मोटारसायकलवर आले होते. काल (मंगळवार) संदीप थनवार याचा मृतदेह स्वच्छता गृहाच्या टाकीत खाली डोके वर पाय अशा अवस्थेत सापडला, तर बुधवारी सचिन घारू व राहुल कंदारे यांचे मृतदेह दरंदले यांच्याच विहिरीत सापडले. सचिन घारू याचे हात, पाय व मुंडके हे चारा कापण्याच्या अडकित्त्त्याचा वापर करून धडावेगळे करण्यात आले होते, तर दोघांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते.
त्यांचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे सचिनचे हात-पाय तोडून ते बोअरमध्ये टाकून देण्यात आले होते. या प्रकाराने सोनई परिसर सुन्न झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून पोलीस खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
दलित समाजातील तिघांचा सोनईजवळ निर्घृण खून
सोनईनजीक दलित समाजातील तिघा तरुणांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. शौचालय साफ करण्याच्या बहाण्याने या तरुणांना विठ्ठलवाडी शिवारात एका बागायतदाराने बोलावून घेऊन त्यांचा काटा काढला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
First published on: 03-01-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered of three dalit samaj peoples in shreerampur