कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे. २००६ च्या शासन निर्णयाद्वारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळी त्या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही दिला आहे. मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

काय आहे कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरण?

कमलाकार जामसंडेकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २ मार्च २००७ या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातली कामं संपवून त्यांच्या घरात टीव्ही पाहात होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहात होते. कमलाकार जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा ३६७ मतांनी पराभव केला होता. कमलाकार जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या. त्यावरुन चार लोक उतरले. त्यातला एकजण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि त्यांच्या घरात शिरला. त्याने त्याच्याकडच्या बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच पॉईंट ब्लँक रेंजवरुन करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. तिने मदतीसाठी धावा केला. जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले.

Sanjay Raut slams Congress
‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

हे पण वाचा- विश्लेषण: अरुण गवळीला फर्लो मंजूर… फर्लो आणि पॅरोलमध्ये काय फरक? ही सवलत म्हणजे कैद्यांचा हक्क असतो का?

कमलाकार जामसंडेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलीस मात्र कसून चौकशी करत होते. त्यावेळी त्यांना समजलं की या हत्येचे धागेदोरे एका आमदारापर्यंत पोहचले आहेत. अर्थातच तो होता डॉन अरुण गवळी. त्यामुळे याच प्रकरणात अरुण गवळीला अटक झाली. कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने ही बाब उघड झाली होती की ही सुपारी अरुण गवळीने दिली आहे. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता. मुंबई पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यानुसार अरुण गवळीला कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी ३० लाख रुपये देण्यात आले होते. अरुण गवळीने काम होईल असा विश्वास सुपारी देणाऱ्या सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांना दिला होता. हे दोघे दगडी चाळीत आले होते. त्यांनी दगडी चाळीतच ३० लाख रुपये अरुण गवळीला दिले होते.

२००६ चा शासन निर्णय काय आहे?

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेतून सूट दिली जाते. त्यानुसार अरुण गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर आता न्यायालयाने यासंदर्भातले निर्देश दिले आहेत.

अरुण गवळीच्या सुटकेचे निर्देश

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याना चौदा वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर, ६५ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांना तुरुंगातून सोडता येईल

अरुण गवळीचा जन्म १९५५ चा आहे. तो आत्ता ६९ वर्षांचा आहे.

जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी २००७ पासून तुरुंगात आहे, त्यामुळे तो १६ वर्षांपासून तुरुंगात आहे

२००६ च्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन अटी अरुण गवळी पूर्ण करतो हे स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीच्या सुटकेचे निर्देश दिले आहेत.