scorecardresearch

Premium

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? नाना पटोले म्हणाले, “आम्ही आधीच सांगितलंय…”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२३ मे) पत्रकार परिषद घेतली.

Nana Patole
नाना पटोले (PC : Congress Youtube)

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील पक्ष मोर्चेबांधणी करू लागले आहेत. काँग्रेसनेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाला सत्तेपासून बाजूला करायचं हा एकमेव उद्देश असल्याचं काँग्रेस नेते सांगत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या बैठका वाढल्या आहेत. भाजपाविरोधात तिन्ही पक्षांनी वज्रमूठ तयार केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष त्यांच्या मित्र पक्षांसह एकत्र लढतील अशी चिन्हं दिसत आहेत. तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील प्रत्येकी तीन-तीन प्रमुख नेत्यांची समिती तयार केली आहे. ही समिती आगामी काळात जागावाटपावर निर्णय घेईल.

Narayan Rane Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर राणे-भुजबळांचा आक्षेप, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारने घेतलेला निर्णय…”
ajit pawar latest news in marathi, parth pawar gajanan marne marathi news
गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”
babasaheb patil asurlekar elected ajit pawar ncp kolhapur district president
कोल्हापूर राष्ट्रवादीत धक्कादायकघडामोडी; जिल्हाध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांचा पत्ता कट,आसुर्लेकर नूतन अध्यक्ष
Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray
“मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, “लबाड लांडग्याने…”

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे दोन पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढतील असं बोललं जात आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. काँग्रेच्या काही नेत्यांनी मुंबई महापालिकेबाबत स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांना याबद्दल पुन्हा एकदा विचारण्यात आलं.

हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र

काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. यावर पटोले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आम्ही आधीच सांगितलं आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समितीची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा नगरपालिकेची, जिथे जिथे जशी परिस्थिती असेल, तिथल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole answer on will congress contest bmc election on its own asc

First published on: 23-05-2023 at 19:20 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×