ज्येष्ठ गांधीवादी व स्वातंत्र्यसेनानी नारायणदासजी उपाख्य काकासाहेब जाजू यांचे शुक्रवारी पहाटे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

काकासाहेब म्हणून सर्वत्र परिचित असलेले नारायणदासजी गत तीन महिन्यापासून आजारी होते. त्यांनी १४ दिवसांपासून अन्न व औषधांचा त्याग केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी यमुनाताई, पुत्र डॉ.उल्हास व सुहास, स्नुषा व मोठा परिवार आहे. स्वातंत्र्य आंदोलनात नारायण देसाई, रामकृष्ण बजाज, चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या गटात त्यांचा सहभाग होता. घनचक्कर ग्रुप म्हणून लढय़ात त्यांची विशेष ओळख होती.