मालवण : भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर रोजी साजरा होणारा ‘नौदल दिन’ यंदा प्रथमच कोकणच्या किनारपट्टीवरील शिवकालीन आरमाराची आद्य वास्तू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सान्निध्यात मालवण-तारकर्ली येथे आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळय़ात भारतीय नौदलाच्या युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि साहसवीर नौसैनिकांनी चित्तथरारक कसरती व प्रात्यक्षिके सादर केली.

हेही वाचा >>> नौदलातील हुद्यांचे भारतीयीकरण, पंतप्रधानांची घोषणा; सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

Bhayander, Former corporators, video
भाईंदर : माजी नगरसेविकांचा गोव्यातील व्हिडीओ व्हायरल, कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात घेराव
protest, Buldhana, Shivsena Uddhav Thackeray faction,
‘केंद्रशासन पक्ष फोडाफाडीमध्ये व्यस्त, दहशतवादी हल्ल्यांचा केव्हा होणार अस्त’
Donald trump and jagannath rathyatra connection
“भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”; काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ रथयात्रेचे कनेक्शन?
Israel air strike on gaza news in marathi
Israel Air Strike on Gaza : गाझामध्ये मोठा नरसंहार! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू; ‘या’ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केलं होतं लक्ष्य
Goregaon-Mulund Link Road, pm modi,
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
Settlement outside Bholebaba Ashram Inspection of the incident site by Chief Minister
‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
amarnath yatra begins amid tight security
प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ
pune airport, Air India Crash airplane, Air India Crash airplane Shifted from Pune Airport, pune airport parking bay, murlidhar mohol, murlidhar mohol met defense minister,pune news,
मोहोळ यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेताच २४ तासांत कार्यवाही! पुणेकरांच्या हवाई प्रवासातील अडथळा तातडीने दूर

सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून पंतप्रधान मोदी यांचे मालवणच्या टोपीवाला बोर्डिग मैदानावर दुपारी आगमन झाले. त्यानंतर प्रथम राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या ४३ फुटी पूर्णाकृती पुतळय़ाचे मोदी यांनी अनावरण केले.  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, आरमार आणि अन्य महत्त्वाचे प्रसंग चितारलेल्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांसह मान्यवरांनी भेट दिली. राजकोट ते तारकर्ली हे अंतर आठ किलोमीटर आहे. हा प्रवास पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी मोटारीने केला. तारकर्ली येथील किनाऱ्यावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल हरीकुमार इत्यादी या सोहळय़ाला उपस्थित होते. नौदलाच्या युद्धनौका, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, छत्रीधारी नौसैनिक इत्यादींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.