Supriya Sule vs Shivsena Sanjay Raut MNS Comment: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नुकतीच अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसैनिकांबद्दलची चिंता व्यक्त करत संजय राऊत आणि शिवसेनेला खोचक टोला लगावलाय.

नक्की वाचा >> मुख्यमंत्रीपदावरुन सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं सुरु असतानाच भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बहुदा उद्धव ठाकरे…”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं. उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तरही सुप्रिया यांनी दिलं. “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
Supriya Sule Vs Sunetra Pawar
ठरलं! बारामतीत नणंद-भावजयीचा सामना, सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा

नक्की वाचा >> संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…”

राऊत काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपदासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात,” असं म्हटलं. “सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हटलं आहेत.

नक्की वाचा >> “राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”

मनसेचा टोला
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील या महत्वाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे तर्क वितर्कांना उधाण आलेलं असतानाच आता या प्रकरणासंदर्भात मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आलीय. मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये संजय राऊतांवर निशाणा साधत शिवसैनिकांकडून राष्ट्रवादी शिवसेनेची कोंडी करत असल्यावरुन आवाज उठवला जाऊ लागल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

संजय राऊतांना शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीकडून होतेय हे
“विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणतात की पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर काल परवाच तुळजाभवानीला जाऊन सुप्रियाताई म्हणतात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे मी नवस फेडायला येईल. शिवसेनेतील गजानन किर्तीकर असतील, खासदार संजय जाधव असतील, श्रीकांत शिंदे असतील नाहीतर इतर सर्व नेते ज्यापद्धतीने राष्ट्रवादी इतर आमदार खासदार आणि शिवसैनिकांची कोंडी करतेय त्याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली तरी सुद्धा ज्या विश्व प्रवक्त्यांना मनसेच्या कोंडीची काळजी आहे त्या संजय राऊतांना शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीकडून होतेय हे पहावत नाहीय की काय?,” असा प्रश्न गजानन काळेंनी उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता…”; सोमय्यांचा हसरा फोटो शेअर करत NCP च्या मिटकरींचा टोला

शिवसैनिकांनो काळजी घ्या आणि
“भविष्यात आता या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री भविष्यात नकोय, असं चित्र सध्या दिसतंय. पुढच्या काही दिवसांमध्ये सुप्रियाताई या पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतायत की काय असं चित्र आता शिवसैनिकांना पहाणं एवढच फक्त या महाराष्ट्रात बाकी आहे,” असा टोला गजानन काळेंनी लागवलाय. तसेच व्हिडीओच्या शेवटी गजानन काळे यांनी, “शिवसैनिकांनो काळजी घ्या आणि या लाचार संजय राऊतांना योग्य वेळी आवरा,” असाही सल्ला दिलाय.