ऊर्मिला मातोंडकर यांचा आशावाद

निर्भया पथकांमुळे महिलांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

bacchu kadu vs ravi rana
“मला अतिशय आनंद होतोय, राणांचा पैसा आणि खासदारकी…”, मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंची घणाघाती टीका
two youth beaten badly in pub
पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरूणीला धक्का लागला अन् राडा झाला…  
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास

महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा येथे सुरू केलेल्या निर्भया पथकाचे उद्घाटन मांतोडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजीपी विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

मातोंडकर म्हणाल्या, की केवळ परकीयांपासून स्वतंत्र होणे म्हणजे ‘स्वातंत्र्य’ नाही तर स्वकीयांच्याही अनावश्यक बंधनांपासून मुक्त होणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. असे स्वातंत्र्य या पथकामुळे नक्कीच मिळेल. त्या पुढे म्हणाल्या, मी महाराष्ट्रात जन्मले आहे तसेच आपण या राज्याची लेकरे आहोत ही भाग्याची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रात मुला-मुलींमध्ये तुलनेने भेदभाव कमी आहे. पण काही ठिकाणी मुलगी आपल्या तोंडून स्वत:बद्दलच्या घटना सांगण्यास घाबरते. या कामी निर्भया पथक मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमाची सफलता ही नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून असते. याची जबाबदारी महिलांवर आहे. त्यांनी पोलिसांना यासाठी साथ दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

नांगरे पाटील यांनी विविध दाखले देत, महिलांना स्वातंत्र्य, सुरक्षितता व भयमुक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, महिलांना सहानुभूती नको तर समानुभूती हवी आहे. स्वयंसिद्ध महिला तयार करणे ही आजची गरज आहे. या पथकाद्वारे महिलांना निश्चितपणे नतिक पािठबा दिला जाईल. या साठी या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाद्वारे सोशल मीडियावर टिंगल, टवाळखोर, महिलांना-मुलींना अश्लील संदेश पाठवणाऱ्यांवरही नजर ठेवली जाईल.

मुद्गल यांनी, पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले ते म्हणाले, समाजाच्या मानसिकतेचे परिवर्तन करण्यासाठी आणि खराब मानसिकतेतून पुढे होणाऱ्या घटनेमुळे जे गालबोट लागलेले असते अशा घटना टाळण्यासाठी निर्भया पथक हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण तक्रार देऊ शकतो. जसे फेसबुक, ट्वीटर, इमेल, डायल १०० यावर तक्रार करू शकता असे ते म्हणाले. संदीप पाटील यांनी निर्भयाच्या रचनेची माहिती दिली. विविध समित्या आणि निर्भया मध्ये तक्रार नोंदवण्याची पद्धत स्पष्ट केली. ‘प्रतिसाद’ हे अ‍ॅप ही विकसित केल्याचे या वेळी सांगितले. नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांबरोबर सहभागी व्हावे असे आवाहन केले.