सावंतवाडी : माझ्या मुंबईच्या घरावर कारवाई असेल किंवा अन्य त्रास देण्याचे प्रकार असतील. सुरुवात त्यांनी केलीय. पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिला. तसेच नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर हे देखील लवकरच कळेल असे ते म्हणाले. ओसरगाव येथील महिला भवनमध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार  प्रकरणं उकरून काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी योग्य त्या परवानग्या मिळवूनच मालवण आणि मुंबईतील घर बांधलं आहे. मुंबईतील घरामध्ये खिडकीची कमान छोटी असावी की मोठी असावी असे किरकोळ आक्षेप मुंबई महानगरपालिकेने घेतले आहेत.  मालवण येथील घराबाबतही मला कुठलीही नोटीस आलेली नाही. तरीही काही माध्यमे चुकीची माहिती देऊन माझी बदनामी करत आहेत. अशी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही श्री.राणे यांनी दिला. महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे अवैध उद्योग अनेक वर्षांपासून चालू होते. ती सर्व प्रकरणं आता उघडकीस येत आहेत. आता नवाब मलिकांचा नंबर लागलाय. त्यानंतर आणखी कुणाचा नंबर असेल हे लवकरच कळेल असे श्री.राणे म्हणाले.

mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा
Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
bjp manifesto sankalp patra
भाजपची विकास, विरासत, ‘विस्तारा’ची संकल्पपत्रात ‘गॅरंटी’
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?