वाई: आज नवरात्रीतील पवित्र खंडेनवमी निमित्त किल्ले प्रतापगड येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेतले.अभिषेक व होम हवन पूजा विधीत त्यांनी सहभाग नोंदवला.प्रतापगड ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गडाचे मालक छत्रपती उदयनराजे यांचे शिंग,तुतारी,ढोल ताशांच्या गजरात मोठे स्वागत केले.आज सोमवारी खंडेनवमी निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन  येथील भवानी मातेची विधिवत व पारंपारिक पद्धतीने पूजा केली.यावेळी सुरु असणाऱ्या पूजेत मंत्रोच्चारात सुरु असणाऱ्या हवन सोहळ्यात उदयनराजे यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी  त्यांचे सहकारी काका धुमाळ उपस्थितहोते.नवरात्रीनिमित प्रतापगडावरील भवानी मातेचा परिसर मंडप टाकून सजवण्यात आला आहे.मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.उदयनराजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भवानी मातेची पूजा केली व सर्वत्र आरोग्य धनधान्य समृद्धी नांदू दे असे साकडे त्यांनी  भवानी मातेला घातले.सातारा शहरात मंगळवारी विजयादशमी अर्थात शाही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरखंडेनवमीनिमित्त प्रतापगडावर दरवर्षी होणारी भवानी मातेची पूजा याचे मोठे महत्त्व आहे यंदाही पारंपारिक पद्धतीने  भवानी देवीचे पूजन  गडाचे मालक खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले.

Pankaja Munde Jarange Patil on a platform in Beed
बीडमध्ये पंकजा मुंडे, जरांगे पाटील एका मंचावर
Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

हेही वाचा >>>लोकांनीच ठरविल्याशिवाय दारुबंदी अशक्य – हसन मुश्रीफ

पूजा झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगड आणि लगतच्या परिसराची पाहणी केली. राज्य शासनाने प्रतापगड आणि किल्ले परिसरातील स्थळांचा विकास करण्यासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली असून त्याचे अध्यक्षपद खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे. त्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यात येणार आहे .यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून राज्यशासनाला सादर केला जाणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले .