पोलीस मुख्यालय मदानावर सन्यभरतीस आलेला नगर जिल्ह्य़ातील सय्यद जमीर सय्यद सलाम हा तरुण शारीरिक चाचणीदरम्यान उंच उडी मारण्याच्या प्रयत्नात डोक्यावर पडून जागीच ठार झाला. सन्यभरतीस मोठय़ा संख्येने तरुण आले आहेत. परंतु त्यांना मूलभूत सुविधाच मिळत नसल्याने तरुणांमध्ये संताप आहे.
पोलीस मुख्यालयावर शनिवारपासून सन्य पोलीसभरती सुरू आहे. त्यासाठी मोठय़ा संख्येने तरुण शहरात दाखल झाले आहेत. परंतु त्यांना राहण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना परीक्षार्थीना सामोरे जात परीक्षा द्यावी लागत आहे. रविवारी धावण्याच्या स्पध्रेत उत्तीर्ण झालेला नगर जिल्हय़ातील सय्यद जमीर सय्यद सलाम (वय २२, चापडगाव, तालुका कर्जत) हा सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उंच उडी स्पध्रेत उडी मारताना डोक्यावर पडला व जागीच ठार झाला. बेशुद्ध पडल्यानंतर डॉ. कुलदीप शहाणे व भरती अधिकाऱ्यांनी या तरुणाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
उंच उडी मारताना तरुणाचा डोक्यावर पडून जागीच मृत्यू
पोलीस मुख्यालय मदानावर सन्यभरतीस आलेला नगर जिल्ह्य़ातील सय्यद जमीर सय्यद सलाम हा तरुण शारीरिक चाचणीदरम्यान उंच उडी मारण्याच्या प्रयत्नात डोक्यावर पडून जागीच ठार झाला. सन्यभरतीस मोठय़ा संख्येने तरुण आले आहेत.
First published on: 04-11-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died in military recruitment