चिपळूणमधील काँग्रेसचा पदाधिकारी संदीप सावंत हा राणे कुटुंबीयांचाच माणूस असूनही त्याला मारहाण होत आहे. नीलेश राणेकडे वंशपरंपरेनेच हा गुण आला असावा, असे मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे, सागर कांदळगावकर, सचिन मोरजकर, शिरोडकर आदी उपस्थित होते.

चिपळूणमधील संदीप सावंत याला माजी खासदार निलेश राणे यांनी मारहाण केल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उपरकर म्हणाले, घरातीलच माणसाला त्यांनी मारले आहे. त्याची बायको व मुलगा तसे सांगता आहेत. निलेश राणे यांनी घर बांधण्यासाठी तो पैसे मागत होता असे म्हटले त्यावर सावंत यांच्या पत्नीने किती जणांना घरे बांधून दिली ते सांगा असा सवाल केला आहे. त्यावरून सारे उघड होईल, असे परशुराम उपरकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलेश राणे यांनी मारहाण केली ती वंशपरंपरा आहे. घरातील एकाला मारहाण करताना कार्यक्रमाचे निमित्त करणे चुकीचे ठरेल असे उपरकर म्हणाले.