साता-यात शांततेत मतदान

पुणे विभाग विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले.

पुणे विभाग विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले. शिक्षक उमेदवारांसाठी एकूण मतदान ४० टक्के तर पदवीधर मतदारसंघासाठी २७ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात शिक्षकांसाठी ४४ मतदानकेंद्रे तर पदवीधरांसाठी १२४ केंद्रे होती. सातारा तालुक्यात ३८ मतदानकेंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यात ८९ हजार पदवीधर तर १६ हजार शिक्षक मतदार आहेत. पदवीधरांच्या मतदारयादीत काही किरकोळ घोळ वगळता मतदान शांततेत पार पडले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Peaceful voting in satara for graduate constituency

ताज्या बातम्या