दीपक महाले, लोकसत्ता

जळगाव : एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील ऐतिहासिक व आकर्षक वास्तू म्हणजे झुलते मनोरे. मोगल राजवटीपूर्वी बांधलेले हे दोन मनोरे पिढय़ानपिढय़ा पर्यटकांच्याही कुतूहल व आकर्षणाचा विषय ठरले. मात्र राजकीय उदासीनतेमुळे ते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. झुलत्या मनोऱ्यांपैकी एक मनोरा मार्च १९९१ मध्ये जमीनदोस्त झाला.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. पर्यटनमंत्र्यांनी या ऐतिहासिक झुलत्या मनोऱ्यांची दुरुस्ती करून या भागास पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे. फरकांडे येथील मनोऱ्यांची दिवसेंदिवस दुर्दशा होत आहे. एरंडोलपासून १६ किलोमीटर, तर कासोदा या बाजारपेठेच्या गावापासून आठ किलोमीटरवर फरकांडे येथील झुलत्या मनोरा पाहण्यासाठी जाता येते. जवळच उतावळी नदी वाहते. तेथून थोडे पुढे अंजनी आणि उतावळी नदीचा संगम आहे. उतावळी नदीच्या काठावर तीन घुमटांची मशीद आहे. या मशिदीसमोर हे दोन मनोरे आहेत.

ही राष्ट्रीय संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

कासोदा या गावापासून तीन किलोमीटरवर व खाचखळग्यांच्या रस्त्यावरून या ऐतिहासिक झुलत्या मनोऱ्यावर जावे लागते. सध्या वास्तूबाहेरचा परिसर अत्यंत गलिच्छ असून, भग्न झालेली प्रवेशद्वारे व कित्येक वर्षांत न उघडलेला दरवाजा आहे. मनोऱ्याच्या वास्तूवर बघितल्यावर भारतातील मोगल कलेच्या वास्तूची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

मनोऱ्याच्या जागेत जनावरे बांधली जातात. पर्यटकांना बसण्याची व्यवस्था नाही. मनोऱ्याची वास्तू अजूनही अप्रतिम असली, तरी भिंतींना मोठे तडे गेले आहेत. झुलत्या मनोऱ्याची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. उर्वरित अवशेषही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने याकामी लक्ष देऊन वास्तूची देखभाल व डागडुजी करावी. वास्तू सुशोभित झाल्यास पर्यटकांचे आकर्षण ठरून खानदेशातील एक पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक वाढेल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना 

वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी चाँद मोमीन याने मनोऱ्यांची बांधणी केल्याचे सांगितले जात असले तरी त्याबाबत ठोस पुरावा नाही. 

असे आहेत झुलते मनोरे : मनोरे जमिनीवर विटा आणि चुना यामध्ये बांधले आहेत. मनोऱ्यांच्या बांधकामात लोखंडी सळईचा वापर केलेला दिसून येत नाही. मनोऱ्यांची उंची साधारण पन्नास फूट आणि रुंदी पाच फूट असून, आतून मनोऱ्याच्या टोकापर्यंत जाण्यासाठी वर्तुळाकार ५६ पायऱ्या आहेत. एकापाठोपाठ चार-पाच जण जिन्याच्या टोकावर जाऊन बसतील अशी व्यवस्था आहे. मनोऱ्यांच्या शिखरावर पंचधातूंचे कळस आहेत. दोन्ही मनोऱ्यांतील अंतर सुमारे २२ फूट असून, दोन्ही मनोऱ्यांच्या आम भागात मंदिराच्या आकाराचे तीन घुमट आहेत. मनोऱ्यालगत वीस फूट अंतरावर तीन कमानी असलेली भिंतत आहे. पूर्वी ही भिंतत मनोऱ्यांबरोबर हलत असे. संपूर्ण वास्तूत वेढून संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, वास्तूत प्रवेश करताच दक्षिणेला पाण्यासाठी आकर्षक दगडी हौद बांधलेला आहे. पूर्वी घोडय़ांचा व हत्तींचा बाजार भरत असे. आजही बाहेर गजशाळा व घोडय़ांची जागा भग्नावस्थेत आहे.

नरेंद्र लांजेवार यांचा विविध क्षेत्रांत वावर होता. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली. लांजेवार यांच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य मित्रपरिवार करणार असून ‘मैत्रीबन’ अतिशय उत्तमपणे फुलवणार आहोत. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुलढाणा