scorecardresearch

Premium

दशकपूर्तीत पोलीस ‘कँटीन’ची उलाढाल दोन कोटींवर; पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली

लष्कराच्या  ‘कँटीन’च्या धर्तीवरील पोलिसांच्या उपक्रमाला अधिक मोठय़ा जागेचे आणि निधीचे पाठबळ मिळाल्यास आणखी भरारी घेऊ शकणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पोलीस कल्याण भांडार
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पोलीस कल्याण भांडार

|| मोहनीराज लहाडे

पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली

farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
The Wadhawan brothers in DHFL fraud
‘डीएचएफएल’च्या वाधवान बंधूंच्या बँक, डीमॅट खात्यांवर टाच 
mill workers got houses
पात्र ५८५ गिरणी कामगार अखेर हक्काच्या घरात, कोन पवनेलमधील घरांचे वितरण
Another six thousand crores tender for road concretization Mumbai news
रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी आणखी सहा हजार कोटींच्या निविदा

नगर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी, बाजारभावाच्या तुलनेत त्यांना सवलतीच्या दरात ग्राहकोपयोगी वस्तू मिळाव्यात या उद्देशाने पोलीस कल्याण विभागाकडून उसने पैसे घेऊन सुरू करण्यात आलेल्या पोलीस कल्याण भांडार (पोलीस कँटीन) विभागाच्या उपक्रमाने दहा वर्षांतच स्वभांडवली होण्याची वाटचाल केली आहे. या उपक्रमाची वार्षिक उलाढाल आता २ कोटींवर जाऊन पोहोचली आहे तर सुमारे ३३ लाखांची शिल्लक (गोदामातील वस्तूंच्या साठा स्वरूपात) जमा आहे. लष्कराच्या  ‘कँटीन’च्या धर्तीवरील पोलिसांच्या उपक्रमाला अधिक मोठय़ा जागेचे आणि निधीचे पाठबळ मिळाल्यास आणखी भरारी घेऊ शकणार आहे.  जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्त आणि निमलष्करी दलाच्या (एसआरपी, सी आय एस एफ, बीएसएफ, एसएसबी, आयटीबीटी, लोहमार्ग पोलीस) कुटुंबीयांनाही संसारोपयोगी दैनंदिन वस्तूंचा सवलतीच्या दरातील लाभ येथे मिळतो आहे. जिल्ह्यातील जिल्हा पोलीस दलाचे संख्याबळ ३ हजार २०० असले तरी ‘कॅंटीन’ची एकूण ग्राहक संख्या ४,५९४ पर्यंत पोहोचली आहे. दरमहा २,२०० ते  २,४०० पोलीस कुटुंबीय या भांडारला भेट देतात. सर्व ‘कॅशलेस’ सुविधा, पोलीस शिस्त, दरवर्षीचे लेखा परीक्षण यामुळे सर्व व्यवहार चोख होतात.

हा उपक्रम पोलीस मुख्यालयात सन २०१२ सुरू करण्यात आला. तेथे मंगल कार्यालय सुरू करण्यात आल्याने आता तो पोलीस अधीक्षक कार्यालयातील एक हजार चौरस फुटांच्या जागेत स्थलांतरित करण्यात आला आहे. प्रतिसादामुळे ही जागा अपुरी पडते. वस्तूंचे सादरीकरण करण्यास अडचण जाणवते. किराणा सामानासह इलेक्ट्रॉनिक वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू  १० ते ५० टक्के सवलतीच्या दरात मिळतात. हवालदार रवींद्र सुपेकर, महिला हवालदार पूजा सावंत, महिला पोलीस गंगावणे येथील सर्व व्यवहार यशस्वीपणे हाताळतात. पूर्वी याच उपक्रमाकडे नियुक्त असलेले परंतु दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव गिरवले विना मानधन सेवा देत आहेत. केंद्रीय पोलीस भांडारमार्फत (पुणे)  गरजेनुसार नगरसाठी दरमहा माल मागवला जातो. थेट उत्पादकाकडून नगरला पुरवठा होतो. नगर पोलीस भांडार केवळ २ टक्के अल्प ‘मार्जिन’वर काम करते. नफा कमावण्याचा उद्देश नसल्याने ही रक्कमही पुन्हा वस्तू खरेदी करण्यात गुंतवली जाते. केंद्रीय भांडारची रक्कमही २० दिवसात फेडली जाते. कार्यालयीन कामकाज, बैठका, टपाल घेऊन येणारे कर्मचारी, अधिकारी ‘कँटीन’ला आवर्जून भेट देतात. दिवाळीच्या काळात अधिक गर्दी होते.

परतफेडही लगेच 

पोलीस कल्याण निधीतून ९ लाख २१ हजार ९४३ रुपयांचे भांडवल घेऊन सन २०१२ मध्ये पोलीस कल्याण भांडारचा (कँटीन) उपक्रम सुरू करण्यात आला. सन १०१८ पर्यंत ही रक्कम दोन हप्तय़ात फेडण्यात आली. सन २०१९ मध्ये या उपक्रमाची उलाढाल १ कोटी ५६ लाख ९१ हजार ३३ रुपये झाली तर यंदा १ एप्रिल २०२१ ते  १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ही उलाढाल २ कोटी ८ लाख ९४ हजार ८६१ रुपयांवर पोहोचली आहे. या शिवाय भांडारकडे स्वभांडवलातून निर्माण झालेला ३३ लाख रुपयांच्या मालाचा साठाही गोदामात आहे.

उपक्रमाला असलेला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद हळूहळू वाढत गेला. आता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोलीस ‘कँटीन’ मधून खरेदी करण्याची सवय रुजली. भांडारसाठी अधिक विस्तृत जागेची आणि वस्तूंच्या डिस्प्लेह्णमध्ये सुधारणा विचाराधीन आहे. जिल्हाभरात पोलीस कुटुंबीयांना माल पोहोचवणे अधिक खर्चिक ठरते, त्यामुळे त्या सुविधेचा विचार होऊ शकत नाही. विस्तारीकरणासाठी भांडवल कशा पद्धतीने उभारता येईल, याचाही प्रयत्न केला जाईल. सध्याही मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा होत आहे. -मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police canteen activities in response to police families over two crores akp

First published on: 14-02-2022 at 01:45 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×