दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दोन दिवसांपूर्वी (२९ मे) पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. तसेंच केंद्रातल्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले होते.

महाराष्ट्र सदनात घडलेल्या त्या घटनेमुळे देशभरातून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर म्हणाले, एक लक्षात घ्या राष्ट्रपतीपदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना हे सरकार डावलतं. त्या अजून जीवंत आहेत, त्यांना हे लोक डावलू शकतात. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला हे लोक डावलू शकतात. तिथे आहिल्याबाई होळकर किंवा सावित्रीबाई फुले यांच्यासारखी हयात नसलेली माणसं या आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) आणि भाजपाच्या खिजगणतीतच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार काही नवीन नाही.

Prakash Ambedkar On Vikhe Patil Nagar
‘भाजपाच्या बड्या नेत्याची मल्लिकार्जुन खरगेंबरोबर गुप्त बैठक’; प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ
Prakash Ambedkar criticises, narendra modi and bjp , Constitutional Changes, Defeat of BJP led Government, buldhana lok sabha seat, buldhana news, vanchit bahujan aghadi, lok sabha 2024, election 2024
“पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी बेंबीच्या देठापासून…” प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “त्यांनी आधी संविधानाबद्दलची…”
prakash ambedkar, alleges, congress leaders afraid, to talk against narendra modi, bjp, vanchit bahujan aghadi, lok sabha 2024, election 2024, election campaign, gadchiroli lok sabha seat,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलण्यास काँग्रेस नेते घाबरतात; प्रकाश आंबेडकर म्हणाले….
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र सदनात जे घडलं तो ओबीसींचा अपमान आहे. भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात. तसेच ज्या महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला ते सदन छगन भुजबळ यांनी बांधलं आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा.

हे ही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या गाठीभेटी वाढण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

रुपाली चाकणकर यांची राज्य सरकारवर टीका

महिल्या आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे.”