महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत अधीक्षक (प्रशिक्षण) पदावर कार्यरत सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.२० वर्षांच्या सेवेत फुलारी यांना आतापर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सुरक्षा पदक, महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालकांचे गौरव चिन्ह, स्वर्णजयंती पदक मिळाले आहे. १९९२ मध्ये फुलारी हे पोलीस उपअधीक्षक म्हणून भरती झाले. पहिलीच नेमणूक नक्षलवादी कारवायांसाठी प्रसिध्द असलेल्या एटापल्ली येथे झाली. तेथे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुणे येथे त्यांनी आर्थिक व सायबर क्राइम शाखेत प्रशंसनीय काम केले. राज्यातील सायबर क्राइममधील पहिली प्रयोगशाळा स्थापन करून त्यांनी अनेकांना प्रशिक्षित केले.