महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी जलविद्युत आंतरराज्य प्रकल्पाचे, गोवा राज्याचे पाणी अडविणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांची भेट मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यात घालून देण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन लांबले आहे. मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण येत्या २४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहणार असून त्या वेळी त्यांची भेट घालून देतो, असे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. गोवा राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यात बसून तिलारी प्रकल्पग्रस्तांनी पाणी रोखले आहे. त्यामुळे गोवा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत नोकरी देण्यास गोवा सरकार बांधील नसल्याचे सांगितले असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा पारा चढला आहे. गोवा सरकारच्या नाकदुऱ्या काढण्याची हीच वेळ आल्याचे काँग्रेस पुढाऱ्यांना वाटत असून काँग्रेसची ही खेळी पंतप्रधानांच्या कानावर घालण्याची संधी गोवा मुख्यमंत्र्यांना मिळाली असल्याने हा दोन सरकारमधील खेळ प्रकल्पग्रस्तांच्या कितपत फायद्याचा ठरतो हे लवकरच उघड होणार आहे. मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी काँग्रेस, तर उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी राष्ट्रवादी संपर्क साधून आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने तिलारी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन लांबले
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी जलविद्युत आंतरराज्य प्रकल्पाचे, गोवा राज्याचे पाणी अडविणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांची भेट मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यात घालून देण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन लांबले आहे.
First published on: 22-12-2012 at 02:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against tilhari project postponed following visit of cm in sindhudurg district