अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नळदुर्ग येथील एका दुकानावर छापा टाकून लाखो रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या घटनेस दोन दिवस उलटले तरी अद्याप कोणावरही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याने या कारवाईवरच संशय व्यक्त केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नळदुर्ग येथील एका दुकानावर २६ फेब्रुवारी रोजी छापा टाकला होता. छाप्यात विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला हा माल जप्त करून संबंधित दुकानदारास सोबत नेण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी दुपापर्यंत या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईवरच संशय व्यक्त केला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2014 रोजी प्रकाशित
गुटखा जप्तीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नळदुर्ग येथील एका दुकानावर छापा टाकून लाखो रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.

First published on: 28-02-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question mark of gutkha sealed action