शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे म्हणाले की, “सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची माहिती अद्याप जनतेपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं जनतेला मिळायला पाहिजे. रिया चक्रवर्तीवर एनसीबीने कारवाई केली. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ड्रग्जसंदर्भातील चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाचा उल्लेख अनेक खासदारांनी आणि मीही केला. पण सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला फोन कॉल आले होते. याचा उल्लेख बिहार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. ते कॉल ‘एयू’ (AU) या नावाने आले होते.”

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका

“रिया चक्रवर्तीच्या कायदेशीर टीमने ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा लावला. तर मुंबई पोलिसांनी याबाबत कुठलाही खुलासा केला नाही. पण बिहार पोलिसांनी जो तपास केला, त्यानुसार ‘एयू’चा अर्थ ‘आदित्य उद्धव ठाकरे’ असा होतो. ही माहिती मला मिळाली आहे. सीबीआयने याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आणली नाही. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती काय आहे? हे समोर यावी, याची विनंती मी गृहमंत्र्यांकडे केली आहे.”

राहुल शेवाळे लोकसभेत नेमकं काय म्हणाले?

राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले की, “रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा. ‘एयू’ हा विषय अतिशय गंभीर आहे. एयूचा अर्थ अनन्या उद्धव असा नाही, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, हे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याची माहिती लोकांना मिळायला हवी.”