scorecardresearch

Premium

“नुसतं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, पण…”, मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा शिंदे सरकारवर संताप

दुकाने आणि आस्थापनांवरील मराठी भाषेतील नामफलकाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप. म्हणाले, आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे.

Eknath Shinde Raj Thackeray (1)
मनसेने गेल्या अनेक वर्षांपासून दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा उचलून धरला आहे.

दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे नियमाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर २८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरू केली जाईल, असं मुंबई महापालिकेने सांगितलं होतं. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. राज्य सरकारने तथा वेगवेगळी शहरं आणि जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनाने राज्यभरात दुकानांवरील आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीत करून घ्याव्यात, अशी मागणी करत मनसेने अनेकवेळा आंदोलनही केलं आहे. तसेच न्यायालयीन लढाई लढली आहे. एका बाजूला मनसेचं आंदोलन चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यायालयानेही दुकाने आणि आस्थानपनांवर मराठी भाषेत नामफलक असायला हवेत असं म्हटलं आहे. परंतु, राज्य सरकार किंवा मुंबई महानगर पालिकेने उचित कारवाई केलेली दिसत नाही

एकट्या मुंबईत तब्बल पाच लाख आस्थापना असून त्यात दुकाने, कार्यालये, हॉटेल, दवाखाने या सगळ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील ८० टक्के आस्थापनांनी मराठी नामफलक लावले असून २० टक्के आस्थापनांनी देवनागरीत फलक लावलेले नाहीत. अमराठी भागात मराठी फलक न लावण्याचे प्रमाण मोठे आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे

Eknath Shinde on Maratha Reservation
‘मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली का?’, विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले…
Vijay Wadettiwar
“छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ…”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ कृतीवरून मुख्यमंत्र्यांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
shivendra singh raje bhosale
सातारा : सरकारने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिला – शिवेंद्रसिंहराजे भोसले
Maratha reservation movement
विश्लेषण : मराठा आंदोलन यशस्वी ठरले असे म्हणावे का? राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतरही काही प्रश्न अनुत्तरित कसे?

राज ठाकरे म्हणाले, आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे. मराठी आणि हिंदुत्वाबद्दल केवळ बोलायला आहे. नुसतं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, बाळासाहेबांचे विचार – बाळासाहेबांचे विचार असं म्हणायचं, पण यांनी बाळासाहेबांचे कोणते विचार घेतले. न्यायालयाने सांगूनही सरकारला दुकानांवर मराठी पाट्या करून घेता येत नाही. यापूर्वी आम्ही मराठी पाट्या केल्या होत्या. तेव्हा सरसकट कराव्या लागल्या होत्या. पण या सरकारचा धाकच नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray gets angry on eknath shinde govt over marathi board on shops asc

First published on: 28-11-2023 at 19:42 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×