रामराजे तर मला गुरुंसारखे आहेत. मी कशाला त्यांना धमकावेन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी साने गुरुजींचे पाढे वाचावेत, असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांना दिला. रामराजेंनी सोमवारी उदयनराजेंपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी एक व्यक्ती म्हणून आपण रामराजेंवर प्रेम करत असल्याचे म्हटले.

उदयनराजे भोसले सोमवारी शिखर शिंगणापूर (ता. माण) येथून श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधला. जशास तसे उत्तर देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. तशी माझी नाही. मी दुर्लक्ष करतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व फार मोठे आहे. त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखे आहे. मी कशाला त्यांना धमकी देऊ. ते तर माझ्यासाठी गुरूच्या ठिकाणी आहेत. गुरूंनी विचार केला पाहिजे. संपूर्ण जीवनात सगळ्यांबरोबर कसे वागावे. साने गुरुजींचे थोडे पाढे त्यांनी वाचले पाहिजेत. खासदारकी, आमदारकी हा विषय नाही. पण, एक व्यक्ती म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो.

thane lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
आदित्य ठाकरे म्हणाले, “उमेदवारीबाबत मिंधेंना गुजरातमधून अद्याप आदेश नाही”
shivaji adhalarao patil, amol kolhe
अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”

कोण बोलतोय, काय बोलतोय? हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. माझा कोण शत्रू नाही. कोण मित्रही नाही. आता तेच मला स्वयंघोषित शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्‍न आहे, माझा नाही, फलटण येथे उदयनराजे रामराजेंचे बंधू रघुनाथराजे यांच्या घरी गेले. त्यांनी रघुनाथराजें, विश्‍वजितराजे, संजीवराजे यांनीही सौजन्याने घरात या, असे म्हणत स्वागत केले. मात्र, उदयनराजे यांनी निवासस्थानाच्या बाहेरूनच पुण्याकडे जाणे पसंत केले

उदयनराजेंनी मला सानेगुरूंजीचे पाढे शिकवावेत: रामराजे

उदयनराजे मला गुरू वगैरे म्हणू लागले आहेत; पण मी कुणाचा गुरू नाही आणि कुणाचा शिष्यही नाही. मला ते मागे बांडगूळ म्हणाले होते. बांडगूळ कधीपासून त्यांचा गुरू झाला, असा प्रतिटोला रामराजेंनी लगावला. साने गुरुजींनी पुस्तके लिहिल्याचे ऐकले आहे, त्यांची पुस्तके वाचली आहेत. मात्र, त्यांचे पाढे माझ्या तरी वाचनात आले नाहीत. त्यांनी मला साने गुरुजींचे पाढे पाठवावेत,  असा टोलाही त्यांनी लगावला.

फलटण येथे येऊन उदयनराजेंनी रामराजेंसंदर्भात विधान केल्यानंतर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर लागलीच रामराजेंनी उदयनराजेंच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज ते मला गुरू म्हणू लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सातार्‍याच्या डाक बंगल्यावर दहा-पंधरा गाड्या घेऊन कशाला आले होते. बघून घेतो, अशी भाषा कशी काय केली होती. आज अचानक मी गुरू कसा झालो. व्हिडिओ पाहिल्यानंतर ते कोणत्या अवस्थेत आहेत ते दिसते आहे. अशा शिष्याची गुरू होण्याची माझी योग्यता नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा गुरू धुंडाळावा. माझ्या त्यांना शुभेच्छा असतील.

मी त्यांना स्वयंघोषित शत्रू मानलेले नाही. त्यांनीच मला स्वयंघोषित शत्रू मानले आहे. साने गुरुजींनी पुस्तके लिहिलेले मी ऐकले आहे, वाचले आहे. पण साने गुरूजींचे  पाढे माझ्या ऐकिवात नाहीत, छत्रपतींनी माझ्या ज्ञानात भर घातली आहे. कुठे साने गुरूजींच्या पाढ्याचे छत्रपतींनी  वाचलेले पुस्तक असेल तर त्यांनी मला जरूर द्यावे, बाकी तुम्ही अन्य कोणती पुस्तके वाचता की वाचत नाही याच्या खोलात मला जायचे नाही, असेही रामराजे यांनी म्हटले आहे.