जीवे मारण्याची धमकी देत शिर्डीतील एका रिक्षा चालकाचे कुख्यात गुंड पाप्या शेख याच्या टोळीतील साथीदारांनी अपहरण केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. ही घटना शिर्डीत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. शिर्डीतील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत चालल्याने त्यावर नियेत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
यासंदर्भात सागर विजय त्रिभुवन (२२, रा.निमगाव शिवार शिर्डी) याने फिर्याद दिली आहे. सागर त्याच्या रिक्षामधुन साईभक्तांना सोडण्यासाठी द्वारकामाई मंदिरासमोर आला असता, तेथे साईनाथ वाडेकर, रुपेश वाडेकर व राहुल िशदे (पुर्ण नावे नाहीत) यांनी सागरला त्याच्याच रिक्षातून पळवून नेले. बिरोबा मंदिर परिसरात नेऊन येथे सागरला त्याचा भाऊ गोिवद विजय त्रिभुवन याच्या पत्त्याबाबत विचारणा करीत, त्याला आमच्या स्वाधीन कर, अन्यथा त्याला आम्ही मारुन टाकू अशी धमकी देत तीघेही पळुन गेले. आरोपी व गोिवद त्रिभुवन यांच्यामध्ये पूर्वीच्या भांडणावरुन वाद आहेत. सागरने दिलेल्या फिर्यादिवरुन पोलीसांनी साईनाथ वाडेकर, रुपेश वाडेकर व राहुल िशदे यांच्याविरुध्द अपहारणाचा गुन्हा दाखल केला.
शिर्डीतील कुख्यात गुंड पाप्या शेख सध्या कारागृहात असला तरी त्याचे दुसऱ्या फळीतील अन्य साथीदार शिर्डीत गुन्हेगारी करीत आहे. पाकिटमाराच्यां टोळीने शिर्डीत उच्छाद मांडला असून या गुन्हेगारांचा बदोबस्त करण्यात शिर्डी पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. नागरिकांनी नुकतेच पोलीसांच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन केले. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांचे अनेक वेळा लक्ष वेधले. परंतु कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. स्थानिक पोलिस कर्मचांऱ्याचे या गुन्हेगारी टोळ्यांना वरदहस्त असल्याने शिर्डीतील गुन्हेगारी दिवसेदिंवस वाढत आहे.