गिरणी कामगारांची २४० दिवस हजेरी असावी, अशी शासनाने मोफत घरांसाठी घातलेली अट शिथिल केली आहे. तसेच मोफत घरांची लॉटरी लागलेल्या ६६५ लाभार्थीनी ३१ डिसेंबपर्यंत पूर्तता करावी म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी तसे जाहीर केल्याची माहिती सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष दिनकर मसगे यांनी दिली. गिरणी कामगार व वारसांना मोफत घरांचा लाभ मिळण्यासाठी शासनाने अटी घातल्या होत्या. त्यातील २४० दिवस हजेरी भरलेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घर, रेशनकार्ड मिळत होते. पण आता या अटीत शिथिलता आणली असल्याने कामगारांना फायदा होईल, असे दिनकर मसगे म्हणाले.
गिरणी कामगार व वारसांना मोफत घरांची लॉटरी लागली त्यांना ३० नोव्हेंबपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचा निर्णय झाला होता. पण सुमारे ६६५ जणांनी पूर्तताच केली नव्हती, म्हणून त्यांना ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ शासनाने जाहीर केल्याचे दिनकर मसगे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2012 रोजी प्रकाशित
गिरणी कामगारांच्या मोफत घरांच्या लाभार्थीसाठी अटी शिथिल
गिरणी कामगारांची २४० दिवस हजेरी असावी, अशी शासनाने मोफत घरांसाठी घातलेली अट शिथिल केली आहे. तसेच मोफत घरांची लॉटरी लागलेल्या ६६५ लाभार्थीनी ३१ डिसेंबपर्यंत पूर्तता करावी म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
First published on: 10-12-2012 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rule for mill worker to get free home become easy