सदू आणि मधू भेटले असतील, मालेगावतली उद्धव ठाकरेंची विराट सभा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील ते त्यांनी एकमेकांनी पुसले असतील. आम्ही त्या भेटीवर काय बोलणार? असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर टोलेबाजी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली तर मग मी काय बोलणार? सदू आणि मधू भेटले. बालभारतीत धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा तसे भेटले असतील. ते जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आलं असेल. मालेगावात जी विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले असतील. आम्ही काय करणार? आम्ही आमचं काम करतोय असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”

महाराष्ट्र वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही

महाराष्ट्रात वीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांना माफीवीर म्हणणं त्यांच्या इतर कुठल्याही प्रकारे अपमान करणं हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. महाराष्ट्र सहन करणार नाही. मी या विषयावर दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनीही मालेगावच्या सभेत वीर सावरकर यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

आम्हाला कुणी सल्ला देऊ नये

काही पक्ष आमच्यावर टीका करतात ते पक्ष आहेत का? ते पिसं गेलेले कावळे आहेत. त्यांनी मॅच फिक्सिंगसारखे आरोप आमच्यावर करू नयेत. मालेगावात जी सभा झाली त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेना कुणाची हे समजलं आहे. बाकी स्वतःला पक्ष म्हणणवाऱ्यांची जी काही मॅच फिक्सिंग राज्यात सुरू आहे ती सुरू राहुदेत आम्ही त्यावर बोलणार नाही. मालेगावात जी सभा झाली त्यातून हे समजलं आहे की येत्या काळात नार्को टेस्ट कुणाची होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही काम उरलेलं नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीही काम उरलेलं नाही. आता उत्तर सभा घेतील, मग दक्षिण सभा घ्या. त्यानंतर नैऋत्य आग्नेय सभा घ्या. हा त्यांना छंद जडला आहे. महाराष्ट्रात त्यांना काही काम उरलेलं नाही. माझं त्यांना सांगणं आहे नीट राज्य कारभार करा. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे त्याला मदत करा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.