Premium

सिंचनवृद्धीमध्ये सांगली मंडळ राज्यात अव्वल

राज्यात विविध सिंचन योजनांमध्ये सर्वात कमीत कमी वेळेत, जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून कृषी विकास साधण्यामध्ये तत्कालीन अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्या नेतृत्वाखालील जलसंपदा विभागातील सांगली पाटबंधारे मंडळ अव्वल ठरले आहे.

Sangli Mandal tops in irrigation
सिंचनवृद्धीमध्ये सांगली मंडळ राज्यात अव्वल (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : राज्यात विविध सिंचन योजनांमध्ये सर्वात कमीत कमी वेळेत, जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून कृषी विकास साधण्यामध्ये तत्कालीन अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्या नेतृत्वाखालील जलसंपदा विभागातील सांगली पाटबंधारे मंडळ अव्वल ठरले आहे. ताकारी, म्हैसाळ योजना – १ लाख ४ हजार आणि टेंभू ७८ हजार हेक्टर‌. एकूण १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील ६२ मंडळांमध्ये सांगली मंडळाचे काम राज्यस्तरावर उत्कृष्ठ ठरले. याबद्दल शुक्रवारी सांगली पाटबंधारे मंडळाकडील अभियंत्यांचा खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – सुषमा अंधारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका: म्हणाल्या, “नवाब मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे…”

टेंभू योजनेसाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली, ताकारी व म्हैसाळ योजनेला गती देऊन आज या योजनेमध्ये प्रस्तावित असलेले ९५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या पुणे येथे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले आणि सांगलीत अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना गुणाले यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत या योजनांना गती विक्रमी सिंचन व्यवस्था उभी केली. टेंभूची बंदिस्त नलिका जलवितरण प्रणाली तर राज्याला पथदर्शक ठरली. यामुळे भूसंपादन करीत असताना येणार्‍या अडचणीवर मात करीत जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यात यश आले आहे.

हेही वाचा – मराठवाड्यातील शेती संकटात, देशभरातील ३१० जिल्ह्यांना बदलत्या पर्यावरणाचा फटका

सांगली पाटबंधारे मंडळ राज्यात अव्वल ठरले असतानाच सांगलीत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले सचिन पवार यांना उत्कृष्ठ अभियंता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी सांगली जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेत वृद्धी करण्यामध्ये कार्यरत असलेले अभियंता महेश रासनकर, अमर सुर्यवंशी, ज्योती देवकर, अभिनंदन हारूगडे, रोहित कोरे, राजन डवरी आदींचा सत्कार करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangli mandal tops in maharashtra in irrigation development ssb

First published on: 08-12-2023 at 18:29 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा