काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल असं वक्तव्य माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलं आहे. व्ही. के. सिंह यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर भारतात येईलच, परंतु चीनने भारताचा हिसकावलेला भाग परत मिळवायला हवा. लडाख, अरुणाचल प्रदेश आणि गलवान खोऱ्यात चिनी सैन्य घुसलंय त्याकडे लक्ष द्या.

खासदार संजय राऊत म्हणाले, लष्कराचे प्रमुखपद भूषवलेल्या एखाद्या व्यक्तीने इतकं बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी चीनने लडाखची जमीन गिळलीय ती ताब्यात घ्या. लडाख, अरुणाचल प्रदेश, गलवान खोरे येथील चीनने ताब्यात घेतलेला भाग परत घ्या. चीनचं सैन्य या प्रदेशात घुसलंय तो भाग ताब्यात घ्या. मग पुढचं आपण पाहू. पाकव्याप्त काश्मीर भारतात आला तर त्याचं स्वागतच आहे.

MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
Uddhav thackeray
हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा संघर्ष; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

संजय राऊत म्हणाले, आम्ही नेहमी स्वप्न पाहिलं आहे. अंखड भारत बनावा, अखंड हिंदुस्थान बनावा असं आमचं स्वप्न राहिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग आहे आणि आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की तो आपल्या देशातच असावा. परंतु व्ही. के. सिंह ज्यावेळी त्या पदावर (लष्करप्रमुख) होते तेव्हा तो प्रदेश घेण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा होता. आता कसा घेणार?

हे ही वाचा >> “…म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळायचं आहे”, संजय राऊतांचा आरोप

संजय राऊत म्हणाले पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, त्यआधी मणिपूर शांत करा. मणिपूरपर्यंत चीन घुसलाय. राहुल गांधी म्हणत आहेत की लडाखमध्ये चीन घुसलाय, अरुणाचल प्रदेशमधील बराचसा भाग चीनने त्यांच्या नकाशावर दाखवला आहे, हे प्रकरण पहिलं संपवा. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घ्या. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, त्यासाठी तुमची गरज नाही.