लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वार्षकि यात्रेस गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. शुक्रवारी एकादशीनिमित्त विविध ठिकाणांहून भगव्या पताका खांद्यावर घेऊन ‘ज्ञानोबा तुकाराम’चा घोष करीत िदडय़ा तेर नगरीत दाखल झाल्या. हरिनामाच्या गजराने तेर नगरी दुमदुमून गेली.
गोरोबाकाका वार्षकि यात्रेनिमित्त गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी सकाळपर्यंत राज्याच्या विविध भागातून िदडय़ांचे तेरमध्ये आगमन झाले. एकादशीनिमित्त पहाटेस खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महापूजा झाली. या वेळी दत्तात्रय मुळे, बाळासाहेब वाघ, बाळकृष्ण लामतुरे, अजय फंड, प्रा. सुधीर कानडे, उषा मुळे, विजया ठोंबरे, लतिका पेठे, रघुनंदनमहाराज पुजारी आदींसह भाविकांची उपस्थिती होती. एकादशीनिमित्त तेरमध्ये दाखल िदडय़ांची नगर प्रदक्षिणा झाली. पहाटेपासून सायंकाळपर्यंत मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी भाविक तेरमध्ये येत आहेत. पहाटेपासून सायंकाळपर्यंत मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. प्रत्येक फडावर हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी झाली. फिरत्या चित्रपटगृहांत (टुिरग टॉकिज) चित्रपट पाहण्यास नागरिकांची, तर पाळण्यात बसण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडत आहे. एस. टी. महामंडळाच्या वतीने यात्रेकरूंसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे यात्रेकरूंना पाणीपुरवठा केला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
हरिनामाच्या घोषाने तेर दुमदुमले
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वार्षकि यात्रेस गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. शुक्रवारी एकादशीनिमित्त विविध ठिकाणांहून भगव्या पताका खांद्यावर घेऊन ‘ज्ञानोबा तुकाराम’चा घोष करीत िदडय़ा तेर नगरीत दाखल झाल्या.
First published on: 26-04-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant goroba kaka fair start in ter