तासगावच्या खुर्चीचा मँचेस्टरपर्यंत प्रवास

भंगारात विकलेली वस्तू ब्रिटनमधील हॉटेलात विराजमान सांगली : तासगावची द्राक्षे ब्रिटनमध्ये पोहोचली त्याला आता एक तपाहून कालावधी लोटला, मात्र आता याच तालुक्यातील सावळजच्या मंडप व्यावसायिकाने भंगारात विकलेली लोखंडी खुर्ची चक्क मँचेस्टरच्या उपाहारगृहात विराजमान झाली असून तिथपर्यंत ती कशी गेली याची चर्चा एका चित्रफीतीमुळे सांगलीमध्ये रंगली आहे. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातील एका […]

‘समाज माध्यमा’वर प्रसारित होत असलेली लोखंडी खुर्ची आणि बाळू लोखंडे

भंगारात विकलेली वस्तू ब्रिटनमधील हॉटेलात विराजमान

सांगली : तासगावची द्राक्षे ब्रिटनमध्ये पोहोचली त्याला आता एक तपाहून कालावधी लोटला, मात्र आता याच तालुक्यातील सावळजच्या मंडप व्यावसायिकाने भंगारात विकलेली लोखंडी खुर्ची चक्क मँचेस्टरच्या उपाहारगृहात विराजमान झाली असून तिथपर्यंत ती कशी गेली याची चर्चा एका चित्रफीतीमुळे सांगलीमध्ये रंगली आहे.

क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातील एका उपाहारगृहात असलेल्या लोखंडी खुर्चीची चित्रफीत  समाज माध्यमांवरून प्रसारित केली. या खुर्चीवर बाळू लोखंडे, सावळज असे नाव आहे. ही चित्रफीत ‘समाज माध्यमा’वर प्रसारित झाल्यानंतर काहींनी लोखंडे यांच्याशी

संपर्क साधला. आजही त्यांचा माया मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय सुरू आहे. त्यांनी सांगितले, या एका खुर्चीचे वजन १३ किलो असल्याने हाताळण्यात अडचणी येत होत्या. याच वेळी प्लॅस्टिकच्या खुर्च्या बाजारात आल्याने त्या हाताळणीस योग्य ठरत असल्याने या लोखंडी खुर्च्या आम्ही भंगारात विकल्या होत्या.

भंगारात विकलेली खुर्ची ब्रिटनमध्ये कशी गेली याची काहीही माहिती नाही असेही त्यांनी सांगितले. समाज माध्यमावर मात्र ‘ब्रिटनने भारताला कसे लुबाडले’ इथपासून ‘जुने ते सोने’ ही म्हण आपण कशी विसरत चाललो आहोत, याचे दाखले बाळू लोखंडे यांच्या खुर्चीवरून दिले जात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scrap metal sold in a hotel in britain akp

ताज्या बातम्या