लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : एका अल्पवयीन मुलीला पोशाख घेऊन देण्याचे आमीष दाखवून दूर अंधारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पुन्हा या घटनेची वाच्यता न करण्याबद्दल तिला चाकूने धमकावल्याबद्दल राहुल गुरूदास तांबे (वय ३४, रा. बार्शी) यास विशेष जिल्हा न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरीसह एक लाख पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Accused sentenced to death for murdering four persons on suspicion of wife character
पत्नीसह कुटुंबातील चौघांचा खून; शिरोळ तालुक्यातील आरोपीस फाशीची शिक्षा
maval marathi news, sexually assaulted and killed 6 year old girl
मावळात बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीच्या आईला सात वर्ष सक्तमजुरी

पीडित अल्पवयीन मुलगी २४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी बार्शीत आपल्या मावशीच्या घरी एकटीच असताना ओळखीचा आरोपी राहुल तांबे याने घरात येऊन तिला पोशाख घेऊन देण्याचे आमीष दाखविले आणि दुचाकीवर बसवून तिला एका नाल्याजवळ निर्जन ठिकाणी अंधारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने पीडित मुलीच्या पोटावर चाकू लावत, घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली पीडित मुलगी घरात कोणाशीही बोलत नव्हती. तिने जेवणही सोडले होते. तेव्हा मावशी आणि आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता घडलेल्या प्रकाराची तिने वाच्यता केली. त्यानुसार तिच्या आईने तात्काळ बार्शी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार बलात्कार, बाललैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचाराच्या आरोपाखाली आरोपीला अटक झाली होती.

आणखी वाचा-सांगोल्याजवळ घरात वृध्द दाम्पत्याची हत्या

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी सरकारतर्फे ॲड. प्रदीप बोचरे यांनी ११ साक्षीदार तपासले. सरकारी पुरावा शाबित झाल्याने विशेष न्यायालयाने आरोपी राहुल तांबे यास दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरी व एक लाख पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला ५० हजार हजार रूपये नुकसान भरपाई अदा करण्याचाही आदेश न्यायलयाने दिला आहे.