राज्यामध्ये सत्तापालट झाल्यापासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये फिरुन पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासहीत बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या ४० आमदारांचा आदित्य हे अनेक सभा आणि भाषणांमध्ये गद्दार म्हणून उल्लेख करताना दिसत आहेत. आदित्य यांनी या बंडखोरांवर केलेल्या टीकेवरुन अनेकदा नाराजीही बंडखोरांनी व्यक्त केलेली असताना आता सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे.

नक्की पाहा >> Photos: “पाया पडतो, भांडू नको…”; स्वत:च्या लग्नात शहाजीबापूंनी पत्नीला सोन्याचे सांगून दिलेले पितळ्याचे दागिने, कारण…

शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंकडून होणाऱ्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त करताना, “त्यांनी शिवसंवाद यात्रा काढली. त्यातून ते रागाच्याभरात आम्हाला फार टाकून बोलतायत,” असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शहाजीबापू यांनी, “सारखं गद्दार गद्दार बोलतायत. केवढं काय बोललेत ते. गटारातील घाण आहे, गद्दार आहेत. ही घाण वाहून जाऊ द्या,” असं म्हणत या टीकेसंदर्भातील नाराजी व्यक्त करतानाच आदित्य यांना एक प्रश्न विचारलाय.

What Kishori Pednekar Said About Raj Thackeray ?
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

नक्की वाचा >> संजय राऊतांविरोधात बंडखोरांमध्ये एवढा रोष का?; शहाजीबापू पाटील म्हणाले, “हा माणूस सकाळी १० वाजता बोलायला…”

आदित्य यांनी केलेली टीका योग्य आहे असं म्हटलं तरी मग आम्ही गटारातील घाण आणि गद्दार असू तर आम्हाला परत का पक्षामध्ये बोलवत आहात असा प्रश्न बंडखोरी करणाऱ्या शहाजीबापू यांनी विचारलाय. “चला ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गटाराची घाण आहे. तुम्ही म्हणताय आम्ही गद्दार आहोत ते ही ठीक आहे. एकाबाजूला तुम्ही आम्हाला गटाराची घाण म्हणता. पण मग पुन्हा ज्याला याचंय त्याने या सांगून बोलवताय कशाला आम्हाला? तिथं काय काम आहे आमचं?” असं शहाजीबापू यांनी आदित्य ठाकरेंना विचारलंय. अगदी सातत्याने होणाऱ्या गद्दार या टीकेल्या वैतागल्याप्रमाणे शहाजीबापूंनी डोक्याला हात लावत हा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर

कालच शहाजीबापूंनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या संस्कारांचा उल्लेख केला होता. “उद्धव ठाकरे काही शब्द बोलले तर तो आमदारांच्या जिव्हारी लागणार नाही. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणे चुकीचे आहे. सर्व आमदारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधाऱ्यांना आदराने, सन्मानाने बोलतो. हा संस्कार आपल्याला आईने बालपणी दिलेला असतो. या पोराला काय शिकवलंय ते समजत नाही. हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही,” असे शहाजीबापू पाटील म्हणाले.