scorecardresearch

Premium

“राज ठाकरेंच्या नातवाला जर तुम्ही…”, शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा; म्हणाल्या, “तुम्ही नैराश्येत आहात!”

शालिनी ठाकरे म्हणतात, “शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात. त्यामुळेच…”

shalini thackeray sushma andhare
शालिनी ठाकरेंचं सुषमा अंधारेंवर टीकास्र (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्यात एकीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना दुसरीकडे मनसेनं मराठीसह इतर मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला होता. आता त्यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण नैराश्यात आहात”, असा टोलाही शालिनी ठाकरेंनी लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटावर टीका करताना त्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर पोस्टही लिहिली होती. त्यावरून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला होता. “एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल. फक्त दुपारी उठून कसं चालेल? यावर बोललं पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Eknath SHinde uddhav Thackeray (3)
“मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंतांना भर सभेत…”
Nitin Gadkari
“चांगलं काम करणाऱ्याला सन्मान मिळत नाही, अन् वाईट…”, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
gautam gambhir arvind kejriwal PTI
“भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव”, केजरीवालांच्या वक्तव्यावर गौतम गंभीरचा टोला, म्हणाला…

शालिनी ठाकरेंचा इशारा

दरम्यान, सुषमा अंधारेंच्या या टीकेला शालिनी ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अंधारेबाई, यापुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात, तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट शालिनी ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) केली आहे. यासोबत शालिनी ठाकरेंनी मनसेचं एक जाहीर पत्रच शेअर केलं आहे.

शालिनी ठाकरेंनी पोस्ट केलेलं पत्र

काय आहे शालिनी ठाकरेंच्या पत्रात?

शालिनी ठाकरेंनी आपल्या पत्रात सुषमा अंधारेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. “काही हिंदू सणांमध्ये डी. जे. व लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी त्याला विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेनं, सर्वपक्षीय संवेदनशील व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं. पण हेच तुम्हाला बहुधा रुचलं नसावं. राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात. कुटुंबाला राजकारणात ओढण्याची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच मग तुमच्यासारखे चेले-चपाटे मागे कसे राहतील?” असा खोचक सवाल शालिनी ठाकरेंनी पत्रातून केला आहे.

“शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात त्यामुळेच तुम्ही संबंध नसताना राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढलं. हे निंदनीय व निषेधार्ह आहे. आपण याची जाहीर माफी मागितली पाहिजे. आपल्यालाही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कुणी अशी विधानं केली र ती तुमच्या मनाला रुचतील का?” असाही सवाल शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंना केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shalini thackeray slams sushma andhare comment on mns chief raj pmw

First published on: 06-10-2023 at 11:02 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×