ew Parliament Building Inauguration by PM Modi: राजधानी दिल्लीसह देशभरात आज नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आज सकाळी पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनाही करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी नेहरूंच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याची भूमिका मांडली. “आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

manoj bajpayee career films family quiz
Quiz: तुम्ही मनोज बाजपेयींचे चित्रपट पाहिलेत? मग या क्विझमधील प्रश्नांची द्या उत्तरं
nilesh sable new show hastay na hasaylach pahije will started from 27th april
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ : निलेश साबळेला नवीन कार्यक्रमाचं नाव कसं सुचलं? सांगितला खास किस्सा
marathi actress kshitee jog talk about mangalsutra wearing after wedding
मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली क्षिती जोग, म्हणाली, “ते घातल्याने…”
nilesh sabale bhau kadam onkar bhojane new show Hastay Na Hasaylach Pahije first promo out
Video: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो समोर, नेटकरी म्हणाले, “तीन एक्के बाजी मारणार पक्के”

“राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणं ही त्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत, त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभेचे अध्यक्ष दिसले याचा आनंद आहे. पण राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती आहेत. पण त्यांची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता का? असा प्रश्न आहे”, असं यावेळी शरद पवार म्हणाले.

“मंत्र्यांनी एक साधा फोन जरी केला असता, तरी…”, सुप्रिया सुळेंची उद्घाटन सोहळ्यावर सूचक प्रतिक्रिया!

“जुन्या संसदेशी आमची बांधिलकी आहे. ही बांधिलकी मी खासदार आहे म्हणून नाही.देशात दिल्लीत कुणीही आल्यानंतर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट या गोष्टी बघण्याचं औत्सुक्य असतं. आता ते सगळं त्याचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. का आहे कुणास ठाऊक. पण ठीक आहे, आता निर्णय घेतला, राबवलाय”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“आमच्याशी चर्चा झाली नाही”

दरम्यान, नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा, त्याचं नियोजन, आराखडा यासंदर्भात इतर पक्षातल्या नेत्यांशी चर्चा झाली नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. “असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे वगैरे यासंदर्भात संसदेत बोललं गेलं नाही.त्यासंदर्भातल्या आराखड्याची चर्चाही कदाचित मर्यादित लोकांशी केली असेल. त्यामुळे आमच्यासारख्या अनेकांना हे माहितीही नव्हतं. त्यात सगळ्यांना सहभागी करून घेतलं असतं, तर ते अधिक चांगलं दिसलं असतं”, असं शरद पवार म्हणाले.

“सभासदांना नेमकं काय निमंत्रण दिलंय हे मला माहिती नाही. कदाचित माझ्या दिल्लीच्या घरी निमंत्रण पाठवलं असेल तर ते मला माहिती नाही”, असंही शरद पवारांनी नमूद केलं.