चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. बीडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभा नियोजित आहेत. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांना मनू संबोधून हे दोघेही ओबीसीविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते झी २४ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

माजी आमदार नारायण मुंडे म्हणाले, काँग्रेसमध्ये अनेक मनु आहेत. ते ओबीसीला संपवत आहेत. म्हणून आम्हाला पंकजा मुंडे यांना मतदान करून ओबीसीला न्याय द्यायचा आहे.

Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”
jay pawar
बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
ashok chavan
Ashok Chavan : अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया यांना भाजपाचं तिकीट? मुलीच्या उमेदवारीवर केलं मोठं विधान; म्हणाले, “मी तिच्यासाठी…”
amit Deshmukh Marathwada leadership marathi news
मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुख यांच्याकडे?
Radhakrishna Vikhe Patil, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना भेटतात हे आश्चर्यकारक – मंत्री विखे

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार आज बीडमध्ये सभा घेणार आहेत. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार मनू आहेत. अंतरवाली सराटीतील आंदोलन शरद पवारांनीच सुरू केलंय. तिथे मराठा समाजाचं आंदोलन त्यांनी केल्यामुळे तिथून त्यांना पळवून लावलं, पोलीस संरक्षणात ते पळून गेले. शरद पवार असो वा अजित पवार असो ते काय ओबीसीच्या बाजूचे नाहीत.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील काही नेत्यांनीही शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवारांच्या पाठिंब्यानेच मराठा आंदोलन उभं राहिलं असल्याचं ते म्हणाले होते.

हेही वाचा >> “देशभरात रामभक्त आहेत हे विसरु नका”, नवनीत राणांचा असदुद्दीन ओवैसींना पुन्हा इशारा

बीडमध्ये काँग्रेसला धक्का

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि महायुतीकडून भाजपाच्या पकंजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, या मतदारसंघात काँग्रेस नेत्याने आता भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. नारायण मुंडे हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नारायण मुंडे यांनी पाठिंबा दिल्याने गेवराई, बीड, माजलगाव येथे पंकजा मुंडे यांना बळ मिळालं आहे.

एकनाथ शिंदे पंकजा मुंडेंबद्दल काय म्हणाले?

“देशात तापमान वाढले आहे. राज्याचेही तापमान ४० पुढे गेले आहे. मात्र, ४ जूनला महाराष्ट्राचा पारा ४५ पार होईल. तसेच देशाचा ४०० पार होईल. महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. तुतारीची पिपाणी होणार आहे. आपल्या देशात फक्त मोदी गॅरंटी चालते. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याची गॅरंटी जनतेने घेतली आहे. बीडची जनता एकदा ज्यांना स्वीकारते त्यांची पुन्हा कधीही साथ सोडत नाही. बीडच्या जनतेने कायम गोपीनाथ मुंडे यांना प्रेम दिले. आता पंकजा मुंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आले आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.