लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलनात झोकून दिलेले एकनाथ शिंदेचलित शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय बंद केले आहे. कार्यालयावरील पक्षाच्या नावासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा हटवून तेथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारंगे-पाटील व मराठा महासंघाचे दिवंगत नेते आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांसह मराठा क्रांती मोर्च्याचा नामफलक उभारला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पक्षाच्या कार्यालयात बसून राजकारण नाही, तर केवळ मराठा आरक्षणासाठी जे जे कृती कार्यक्रम ठरविले जातील, ते अंमलात आणण्याची भूमिका अमोल शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.

Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न
Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

आणखी वाचा- मराठा आरक्षणासाठी सोलापुरात जळते टायर टाकून ‘रास्ता रोको’ सुरूच

मराठा आरक्षणासाठी जळगावात अंतरावली सराटीत मनोज जारंगे-पाटील गेले सात दिवस आमरण उपोषण करीत आहेत. तर अनेक भागातही कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू असताना दुसरीकडे गेल्या १३ दिवसांत २५ तरूणांनी बलिदान केले आहे. त्याचा विचार करता शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देणे ही आपल्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे. ‘आधी आरक्षण आणि नंतर राजकारण ‘ ही भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. आपण ज्या समाजात जन्मलो, तो मराठा समाज महत्वाचा आहे. समाजाला आरक्षण मिळेल आणि त्यावर संपूर्ण समाजाचे समाधान होईल, त्यानंतर पुन्हा आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.