scorecardresearch

अमरावतीत रवी राणांच्या प्रतिमेला चपलांचे फटके

आमदार रवी राणा यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत शिवसेना ही सुलेमान सेना झाली आहे, अशी टीका केली होती.

(संग्रहित छायाचित्र) आमदार रवी राणा

अमरावती : शिवसेना ही सुलतान सेना झाली असे वक्तव्य केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेला शुक्रवारी चपला, बुटांचे फटके मारत संताप व्यक्त केला. नागपुरी गेट परिसरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी राणा यांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार रवी राणा यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत शिवसेना ही सुलेमान सेना झाली आहे, अशी टीका केली होती. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून राणांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. यावेळी नागपुरी गेट परिसरात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने राणा दाम्पत्याला भरभरून मते दिली होती, मात्र आता हनुमान चालिसाच्या मुद्यावरून राणा दाम्पत्य कट्टर हिंदूत्वाकडे वळल्याने अल्पसंख्यांकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivaji maharaj muslim brigade workers hit footwear to ravi rana poster in amravati zws

ताज्या बातम्या