देशाच्या नेतृत्वासाठी विश्वासार्ह चेहराच नाही असे मत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंततर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेत एकही सक्षम नेता उरलेला नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. ते नागपुरात बोलत होते. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱयावर असल्याने तेथील कार्यक्रमांत आणि प्रसारमाध्यमांसमोर त्यांना हिंदीत बोलावे लागले. यावर फक्त दिल्लीला जाऊन कोणी राष्ट्रीय नेता होत नाही, त्यासाठी आधी हिंदी नीट यावे लागते. असेही नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ‘असोचॅम’ या उद्योजक संघटनेच्या ९२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या सोहळ्यात बोलताना काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली होती. “काँग्रेसमध्ये कोणीही सक्षम नेता नाही. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात येणारे सरकार आमचेच असेल आणि ते सध्याच्या सरकारपेक्षा अनेक पटींनी चांगले असेल” असे उद्धव ठाकरे कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर आज शनिवार उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत स्पष्ट उत्तर दिलेले नाही. त्याबाबतही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर ते स्पष्ट वक्ते नाहीत असे म्हणत शरसंधान साधले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘शिवसेनेतही कोणी सक्षम नेता नाही’ नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
देशाच्या नेतृत्वासाठी विश्वासार्ह चेहराच नाही असे मत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंततर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेत एकही सक्षम नेता उरलेला नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

First published on: 20-07-2013 at 06:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivesena doesnt have the strong leader narayan rane