Premium

सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक, अज्ञातांनी नारायण राणेंच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांच्या मोटारीवर अज्ञात व्यक्तींनी चप्पलफेक केल्याचा प्रकार सायंकाळी घडला.

Slippers thrown at Sanjay Rauts car in Solapur

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांच्या मोटारीवर अज्ञात व्यक्तींनी चप्पलफेक केल्याचा प्रकार सायंकाळी घडला.

खासदार राऊत हे सायंकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर शहराच्या हद्दीत बाळे येथे बाबासाहेब श्रावण भंवर या शिवसैनिकाने उभारलेल्या ‘हॉटेल लिमोर’चे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तेथून शहराकडे परत येत असताना बाळे उड्डाणपुलावरून कोणी तरी अज्ञात समाजकंटकाने खाली संजय राऊत यांच्या मोटारीवर चप्पल फेकली. हा प्रकार राऊत यांना समजलाही नाही. नंतर प्रकार नंतर लक्षात आला. तेव्हा शिवसैनिकांसह पोलिसांची धावपळ सुरू झाली.

आणखी वाचा-सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपचीच- जयकुमार गोरे

खासदार राऊत यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातील वार्तालापासह महाविकास आघाडी व शिवसेनेची स्वतंत्र बैठक, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या शेतघरात हुरडा पार्टी, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे संघटक अमित भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, शिवसैनिक बाबासाहेब भंवर यांच्या नवीन हॉटेलचा शुभारंभ आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या पुत्राच्या विवाहानिमित्त स्वागत सोहळ्यात उपस्थिती अशा विविध भरगच्च कार्यक्रमांना हजेरी लावली होती. नंतर ते मुंबईकडे रवाना झाले.

चप्पल फेकताना नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Slippers thrown at sanjay rauts car in solapur mrj

First published on: 10-12-2023 at 20:18 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा