श्वानानेच मालकिणीवर हल्ला केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र, पुण्यात एका श्वानानेच नागापासून आपल्या मालकिणीचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patals) यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या पत्नीवर नागाने हल्ला केला होता. मात्र, त्यांच्या घरातील श्वानाने नागावर हल्ला करत मालकिनीचा जीव वाचवला. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

हेही वाचा- सांगलीच्या गोटखिंडीत मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ४३ वे वर्ष

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

नागाला पाहून वळसे पाटील यांच्या पत्नी खाली पडल्या

हा सगळा प्रकार वळसे पाटील यांच्या पुण्यातील निरगडसर इथल्या घरी घडला आहे. रामदास वळसे-पाटील (Ramdas Walse Patil) यांच्या पत्नी चंदा वळसे-पाटील अंगणातील गेटजवळ गेल्या होत्या. तेव्हा अचानक भलामोठा नाग त्यांच्यासमोर आला. नागाला पाहून चंदा वळसे पाटील घाबरल्या आणि अंगणात खाली पडल्या.

हेही वाचा- “चून चून के मारे जाएंगे”, बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांचा धमकीवजा इशारा; म्हणाले, “कालच हिशोब चुकता केला असता पण…”

श्वानाने वाचवला जीव

मालकिणीला खाली पडलेलं पाहून घऱातील श्वानाने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. एवढचं नाही तर त्या नागावर हल्ला करत त्याला गेटबाहेर हुसकावून लावले. श्वान आणि नागाच्या संर्घषाचा हा व्हिडिओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे.