राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात कार उभी असताना अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची कार जिल्हा बँकेच्या आवारात उभी होती. तेव्हा अज्ञातांनी कारच्या समोरील काचेवर दगडफेक केली. तसेच, कारवर ऑइलही फेकलं आहे.

Thackeray group, resign, Thane,
ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
News About Salman Khan
Salman Khan: “सिगरेट पिते पिते जाना..”, सलमानच्या घरावरच्या हल्ल्याआधीचं शूटर्स आणि बिश्नोई यांच्यातलं संभाषण समोर
Sharad Pawar, Sharad Pawar news,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी; अमित शहांनी केली होती जहरी टीका
FIR, developer, Radhai illegal building, Nandivali Panchanand Dombivli, BJP party workers
डोंबिवली नांदिवली पंचानंंद येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ
ias puja khedkar, manorama khedkar
“तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये?”, IAS पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटीस
pune ias puja khedkar marathi news
IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना पुणे महापालिकेची नोटीस, घराबाहेरील अनधिकृत बांधकाम न काढल्यास…
Charge sheet filed in Salman Khan house firing case
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी आरोपपत्र दाखल
Rajesh Shah Worli BMW hit-and-run case
Worli Hit And Run Case : राजेश शाहांना २४ तासांच्या आत दिलासा, १५ हजारांच्या तात्पुरत्या बाँडवर जामीन मंजूर

याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. राजेश टोपे म्हणाले, “लोणीकरांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या आवारात आणि माझ्या कारवर दगडफेक केली आहे. यात कारची समोरील काच फुटली आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्य आहे.”